‘खूबसूरत’ उन्हाळ्यासाठी...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

पुणे - किती हा उन्हाळा, ‘खूबसुरती बरकरार रखने के लिए कुछ तो करना पडेगा’ असे म्हणत इच्छा आणि तिच्या मैत्रिणी बाजारपेठा फिरू लागल्या... इच्छाप्रमाणेच कित्येकजणी सनकोट, गॉगल, हॅण्डग्लोज, सॉक्‍स, टोप्या, सुती कपडे, रंगीबेरंगी स्टोलस्‌ खरेदी करत आहेत. त्यामुळे बाजारपेठांमध्ये तरुणाईची गर्दी झालेली दिसत आहे. खरेदीसाठीचे तरुणींचे हक्काचे ठिकाण असलेल्या तुळशीबाग, फर्ग्युसन रस्ता, हाँगकाँग लेन, कॅम्पमध्ये शनिवार आणि रविवारी प्रचंड गर्दी दिसत आहे, तर काहींनी जुने सनकोट्‌स, हॅण्डग्लोज आणि सुती कपड्यांची शोधाशोध सुरू केली आहे.

‘व्हरायटी’चा शोध
ऋतू कोणताही असो, त्याप्रमाणे ॲटिट्यूड कॅरी करणारी तरुणाई उन्हाळ्यात गॉगल, कॅप, सुती कपड्यांमध्ये भाव खाऊन जाते. उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्यावर ते भर देत असतात. त्यामुळे कपड्यांची खरेदी करताना रंग पांढरा निवडत असले, तरी त्यामध्ये व्हरायटी शोधत असून, काही वेळा विक्रेत्यांसोबत अरेरावी करतानाही दिसत आहेत.

ॲटिट्यूडला चार चाँद
फर्ग्युसन रस्त्यावरील विक्रेता म्हणतो, ‘‘उन्हाळा असो वा हिवाळा. गॉगल हे मुलांच्या ॲटिट्यूडला चार चाँद लावतात, त्यामुळे गॉगल खरेदीसाठी ऋतू महत्त्वाचा ठरत नाही; मात्र उन्हाळ्यात तरुणाई काळा गॉगल लावण्यावर भर देताना दिसते.’’

तरुणी म्हणतात...
   गाडी चालविताना हेल्मेट, शॉट स्टोल, हॅण्डग्लोज, सनकोट आणि काळा चष्मा लावून गाडी चालविण्याची वेगळीच मजा. हा हटके लुक थोडा खिशावर ताण देणारा असला तरी भारी वाटतो.
   गाडी चालविताना त्वचा काळी पडू नये म्हणून शॉर्ट हॅण्डग्लोज आणि सॉक्‍स खरेदीला पसंती.
   कडक उन्हापासून संरक्षण मिळविण्यासाठी सुंदरसा स्कार्प आणि हेल्मेट खरेदी करणे आलेच.

Web Title: marathi news pune news summer use goods