सुप्रिया सुळे आता ब्लॉगद्वारे मत मांडणार

मिलिंद संगई
शनिवार, 13 जानेवारी 2018

बारामती : खासदार सुप्रिया सुळे या आता आपली विविध विषयांवरील रोखठोक मते ब्लॉगच्या माध्यमातून मांडणार आहेत. राज्यस्तरीय व राष्ट्रीय राजकीय, सामाजिक, आर्थिक व इतर क्षेत्रांतील घडामोडींवर ब्लॉगच्या माध्यमातून त्या व्यक्त होणार आहेत. 
सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक सक्रिय होत सामान्य जनतेपर्यंत आपली भूमिका पोहचण्यासाठी स्वत:चा ब्लॉग लिहिण्यास सुप्रिया सुळे प्रारंभ करणार आहेत. राज्यातील व राष्ट्रीय राजकीय, सामाजिक, आर्थिक व विविध क्षेत्रांतील चालू घडामोडींवर हा ब्लॉग आधारित असणार आहे. मकरसंक्रातीनिमित्त 14 जानेवारी रोजी त्यांचा पहिला ब्लॉग प्रकाशित होणार आहे.

 लोकसभेत सुळे यांच्या कामगिरीने देशभरातील खासदार प्रभावित आहेत. त्या सभागृहात केवळ हजेरी लावत नाहीत तर प्रत्येक चर्चेत सहभागी होत त्या आपली मते अतिशय परखडपणे मांडतात. त्यांची मांडणी व भूमिका याबाबत सर्वच पक्षांचे नेते, युवा खासदार व राजकीय समीक्षक कौतुक करतात. मात्र, लोकसभेत मांडलेली भूमिका सामान्य जनतेपर्यंत फारशी प्रभावीपणे पोहचत नाही. त्यामुळे थेट जनतेपर्यंत भूमिका पोहोचावी यासाठी त्यांनी ब्लॉग लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. 
राज्याच्या राजकारणात ब्लॉग लिहिणारे फार कमी नेते आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मागील दोन वर्षांपूर्वी "दैनिक सकाळ' च्या सप्तरंग पुरवणीत विशेष लेखन केले होते. सुशीलकुमार शिंदे, मनोहर जोशी, पृथ्वीराज चव्हाण यांनीही वर्तमानपत्रातून विशेष लेखन केले आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांशी व जनतेशी थेट संपर्क साधण्याचा सुप्रिया सुळे यांचा मानस आहे. सध्याचे प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाचा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळे फेसबुक, ट्‌विटरसोबत आता ब्लॉगच्या माध्यमातूनही सुळे यांची मते जाणून घेता येणार आहेत.

Web Title: Marathi news pune news supriya sule becomes a blogger