‘स्वाइन फ्लू’ लस मोफत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

पुणे - स्वाइन फ्लूच्या विषाणूंना मार्च महिन्यात पोषक वातावरण असल्यामुळे त्याची लागण होण्याची शक्‍यता जास्त असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वयोवृद्ध, गर्भवती स्त्रियांसह दुर्धर आजाराने ग्रस्त व लहान मुलांसह सर्वांसाठी महापालिका रुग्णालयांमध्ये ‘स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस’ मोफत उपलब्ध केली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आली आहे. 

या संदर्भात महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, ‘‘तीन वर्षांपूर्वी ‘एच१एन१’ या विषाणूंच्या रचनेत बदल झाले होते. सर्दी, ताप व खोकला या लक्षणांसह जुलाब, उलट्या ही लक्षणेदेखील दिसून येत असल्याचा अहवाल ‘राष्ट्रीय विषाणू संस्थे’ने (एनआयव्ही) दिला आहे. यंदा एक जानेवारीपासून २१ फेब्रुवारीपर्यंत एक लाख २७ हजार ९६९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २ हजार २४० जणांना ‘टॅमी फ्लू’ गोळ्या देण्यात आल्या. तर ३ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी कमला नेहरू रुग्णालयासह महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांवर स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध आहे.’’

साडेतीन हजार लस 
पुणे महापालिकेची प्रसूतिगृहे, रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांसाठी दहा लाख रुपयांमध्ये ३ हजार ५०० स्वाइन फ्लू प्रतिबंधक लसींची खरेदी करण्यात आली आहे. यंदा ‘स्वाइन फ्लू’वर नियंत्रण मिळविण्यासाठी अर्थसंकल्पातदेखील तरतूद करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागरिकांना ही लस मोफत देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अंजली साबणे यांनी या वेळी दिली.

Web Title: marathi news pune news swine flu health PMC