तळेगाव दाभाडेत शांततेत बंद

गणेश बोरुडे
बुधवार, 3 जानेवारी 2018

तळेगाव : कोरेगाव भीमा येथील दगडफेकीच्या निषेधार्थ बुधवारी (ता.०३) पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला तळेगाव दाभाडे (ता.मावळ) आणि स्टेशन विभागात चांगला प्रतिसाद मिळाला. तळेगाव स्टेशन परिसरात व्यापारी व्यवसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती. जिजामाता चौकापासून निघालेले मोर्चेकरी काही काळ स्टेशन चौकात ठिय्या मांडून, पुढे मोर्चा वडगावच्या दिशेने रवाना झाला. आरपीआयचे उपाध्यक्ष सुनील पवार, संतोष सोनवणे, किरण साळवे, पांडुरंग सोनवणे, गौतम अहिरे, संदीप शिंदे, अनिल भांगरे यांच्यासह दलित संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हातात निळे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

तळेगाव : कोरेगाव भीमा येथील दगडफेकीच्या निषेधार्थ बुधवारी (ता.०३) पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला तळेगाव दाभाडे (ता.मावळ) आणि स्टेशन विभागात चांगला प्रतिसाद मिळाला. तळेगाव स्टेशन परिसरात व्यापारी व्यवसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती. जिजामाता चौकापासून निघालेले मोर्चेकरी काही काळ स्टेशन चौकात ठिय्या मांडून, पुढे मोर्चा वडगावच्या दिशेने रवाना झाला. आरपीआयचे उपाध्यक्ष सुनील पवार, संतोष सोनवणे, किरण साळवे, पांडुरंग सोनवणे, गौतम अहिरे, संदीप शिंदे, अनिल भांगरे यांच्यासह दलित संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हातात निळे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. जनसेवा विकास समितीचे प्रवर्तक किशोर आवारे, नगरसेवक सुशील सैंदाणे, गणेश खांडगे, अनिता पवार आदींनी मोर्चात सहभाग नोंदवत पाठिंबा दिला. मोर्चादरम्यान चाकण रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. एरव्ही रहदारीने गजबजलेल्या तळेगाव-चाकण रस्त्यावर शुकशुकाट जाणवला. पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील, उपनिरीक्षक ज्ञाज्ञेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.एमआयडीसी पोलीस ठाण्यातर्फे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली देहू फाटा, इंदोरी, आंबी आणि नवलाख उंबरे तसेच एमआयडीसी परिसरात बंदोबस्त आणि फिरता पहारा ठेवण्यात आला होता. रस्ते वाहतूक वगळता तळेगाव एमआयडीसीतील बहुतांश उद्योगजगतावर बंदचा परिणाम जाणवला नाही. सायंकाळनंतर हळूहळू वाहतूक पूर्ववत होत गेली.

Web Title: Marathi news pune news talegao dabhade peacefully strike