ट्रक-टेम्पोच्या अपघातात टेम्पो चालक जागीच ठार

संदिप जगदाळे
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

हडपसर (पुणे) : सिग्नलवर थांबलेल्या ट्रकला मागून भरधाव टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर क्लीनर गंभीर जखमी झाला आहे. टेम्पोच्या केबीनमध्ये अडकलेल्या चालकाला तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले. ही घटना पंधरा नंबर चौकात सोमवारी रात्री पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर सोलापूर रस्त्यावर तब्बत तीन तास वाहतूक कोंडी झाली. 

या घटनेत टेम्पो चालक मुबारक साहेबकिरा जाहागिरदार (वय ५०, रा. करमाळा, बार्शी) हे मृत्यूमुखी पडले आहेत. तर टेम्पोचा क्लिनर आबासाहेब विश्वबंर चौधरी (वय ३८, रा. लातूर ) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. 

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक सिग्नला उभा होता. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोंची ट्रकला धडक बसली. ही धडक एवढी मोठी होती की टेम्पोचे केबीन पुढील बाजूने पूर्नपणे चेंबले. त्यात चालक व क्लिनर अडकून पडले. सुरवातीला आग्नीशामक दलाचे कर्मचारी व नागरिकांनी टेम्पो चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. त्यांनतर रेस्क्यू टिम आणि क्रेनच्या सहाय्याने बॅानेटमध्ये अडकेल्या चालकाला दोन तासांनतर बाहेर काढण्यात यश आले. अपघात झाल्यानंतर चालक जीवंत होता. मात्र त्याला अडकलेल्या स्थितीत बाहेर काढण्यात अपयश आल्याने व वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार पाहणा-या बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तसेच अपघातात वाहने बाजूला काढण्यास वेळ लागल्याने सोलापूर रस्त्यावर तब्बल दोन तास वाहतूक कोंडी झाली होती.

Web Title: Marathi news pune news tempo truck accident driver dies