पुणे - थेरगावमध्ये टोळक्याकडून तरुणाचा खून

संदीप घिसे 
शुक्रवार, 9 मार्च 2018

पिंपरी (पुणे) : ग्रुपच्या वर्चस्वातून आणि मित्रांमध्ये ऐकमेकांची निंदा केल्याच्या कारणावावरून एका तरूणाचा कोयता व चॉपरने वार करून खून करण्यात आला. ही घटना गुरूवारी (ता.८) रात्री थेरगाव येथे घडली.

रूपेश सुखबिर सोराती (वय २४, रा. आदर्शनगर, काळेवाडी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. सोन्या उर्फ रोहित डावरे, शुभम टकले, ईश्वर लोंढे, योगेश उर्फ दादा आणि इतर चार ते पाच जण अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. राजेश अशोक सायलु (वय २० रा. आदर्शनगर, काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळेवाडी परिसरामध्ये मयत व आरोपी यांचे दोन वेगवेगळे ग्रुप आहेत. आपल्याच ग्रुपचे वर्चस्व परिसरावर राहावे यावरून त्या दोन ग्रुपमध्ये वादविवाद होत. त्यातच एकमेकांविषयी मित्रांमध्ये वाईट बोलणेही आले. या कारणावरून २० फेब्रुवारीला या दोन गटांमध्ये भांडणेही झाली होती. त्यावेळी मयत रुपेश सोराती याच्यावर गंभीर मारहाण केल्याचा गुन्हाही दाखल झाला होता. या मारहाणीचा बदला घेण्यासाठी गुरुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसात संगनमत करून खून करून कायमचा काटा काढण्याचे ठरविले.

फिर्यादी राजेश  सायलु, राजू खान आणि रूपेश सोराती हे तिघेजण दुचाकीवरून चालले होते. थेरगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ आरोपींनी त्यांना अडवले. आरोपींनी रुपेश यांच्यावर कोयता, चॉपर तसेच सिमेंटच्या गट्टूने हल्ला चढविला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रूपेश याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे साडेचार वर्षांच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तीन आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Marathi news pune news thergao murder group of boys 1 dies