विद्यार्थ्यांनी घेतली तंबाखू मुक्तीची शपथ

संदिप जगदाळे
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

हडपसर(पुणे) : तंबाखू मुक्त शाळा करण्याची शपथ ज्ञानसागर प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी घेतली. 'घ्याल तंबाखूची साथ तर आयुष्य होईल बरबाद' अशा घोषणा दिल्या. यावेळी तंबाखू व गुटखा ग्रस्त असलेल्या प्रतितात्मक पुतळ्याचे दहन करून विद्यार्थ्यांनी तंबाखू मुक्त शाळा करण्याचा संकल्प केला.

तंबाखू व गुटखाग्रस्त असलेल्या प्रातिनधिक पुतळ्याचे दहन करून विद्यार्थ्यांनी तंबाखू मुक्त शाळा करण्याचा संकल्प केला. तंबाखू मुक्तीचा विचार मुलांमध्ये रुजाविण्यासाठी मुख्याध्यापक प्रितम बर्गे यांच्या मार्गदर्शनाने झाले. या उपक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख कुणाल छाया हेंद्रे. रिबेका मोहिते, विजया मोरे, अंजना कवटे, दिपाली बर्गे, गुलचंद मुंढे यांनी केले. यावेळी विदयार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखूमुखे होणारे आजार व त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण याबाबत माहिती सांगण्यात आली.

Web Title: Marathi news pune news tobacco free oath