तिळगूळ खा, वाहतुकीचे नियम पाळा

संदिप जगदाळे
सोमवार, 15 जानेवारी 2018

हडपसर : एरवी वाहतूक पोलिसांकडून नागरिकांच्या हातात केवळ दंडात्मक कारवाई केल्याच्या पावत्या दिल्या जातात. मात्र, रविवारी मकरसंक्रांतीचे औचित्य साधत वाहतूक पोलिसांनी विविध सिग्नलवर वाहन चालकांना गुलाबपुष्प देऊन व तिळगुळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्याने नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. 

पोलिसांच्या जनप्रबोधनाची गांधीगिरी बघून नागरिक अवाक् झाले. निमित्त होते, बंडगार्डन वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने राबविलेल्या 'हॅपी संक्रांत’ उपक्रमाचे. या सणाचे औचित्य साधत वाहनचालकांना विविध सिग्नलवर पोलिसांनी गुलाबपुष्प व तिळगूळ वाटप करत ‘हॅपी संक्रांत’ म्हणून शुभेच्छा दिल्या. 

तसेच दुचाकी चालविताना ‘हेल्मेट वापरा, अपघातात होणारा मृत्यू टाळा,’ ‘हेल्मेट है जरूरी, ना समजो इसे मजबुरी’, ‘सीट बेल्ट वापरा, सुरक्षित राहा,’ दारू पिऊन वाहने चालवू नका, ‘रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना प्रथम प्राधान्य द्या’, ‘वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा’ अशा प्रकारच्या सूचना देत शुभेच्छा दिल्या.

पोलिसांची ही गांधीगिरी बघून बहुतांश लोक थक्क झाले. सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष गोरे म्हणाले, मकर संक्रातीचा सण हा स्नेह वाढवण्याचा सण असतो. तिळगुळाची देवाण-घेवाण स्नेहाची गोडी वाढवण्यात मदत करते. खास संक्रातीच्या या सणाचे निमित्त साधून आमच्या वाहतूक शाखेने 'तिळगूळ खा, वाहतुकीचे नियम पाळा' हा नागरिकांमध्ये स्नेहवर्धन आणि सुरक्षेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे नागरिकांनी पालन करावे, हा या मागचा उद्देश आहे. आमच्या शाखेचे पोलिस निरिक्षक अतुल नवघीरे यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीतील महत्वाच्या चौकात हा उपक्रम राबविला जात आहे. 

Web Title: Marathi news pune news traffic police rules