विद्यार्थ्यांनी केली वाहतूक नियमांबाबत जनजागृती

संदिप जगदाळे
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

हडपसर (पुणे) : हेल्मेट घाला, सीटबेल्ट लावा, सिग्नल तोडू नका, नो-पार्कींगमध्ये गाडी उभी करू नका, झेब्रा क्रॅासिंगवर वाहने थांबवून नका, वाहने भरधाव वेगाने चालू नका, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, आपला जिव सांभाळा, दुर्घटना व अपघात टाळा, रस्ताही तुमचाच, वेळही तुमचीच, घाई केली तर, मृत्यूही तुमचाच.

हडपसर (पुणे) : हेल्मेट घाला, सीटबेल्ट लावा, सिग्नल तोडू नका, नो-पार्कींगमध्ये गाडी उभी करू नका, झेब्रा क्रॅासिंगवर वाहने थांबवून नका, वाहने भरधाव वेगाने चालू नका, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, आपला जिव सांभाळा, दुर्घटना व अपघात टाळा, रस्ताही तुमचाच, वेळही तुमचीच, घाई केली तर, मृत्यूही तुमचाच. नका देऊ प्राण, नका घेऊ प्राण, डावीकडून चालून राखा आयुष्याची शान, वाहतूक नियमांचे पालन होईल जेव्हा, वाहनधारकांच्या जीवनाचे रक्षण होईल तेव्हा, वेगाने वाहने चालवू नका मृत्यूस आमंत्रण देऊ नका, कदर व्हावया तुमच्या प्राणाची, आदर करा रस्ता सुरक्षा नियमाची, वाहने आहेत चालवण्यासाठी नव्हे अपघात करण्यासाठी, होईल दोन मिनिटाचा उशीर, पण जीवन राहील सुरक्षित, पाळूया निर्बंध रहदारीचा करूया प्रवास आनंदाचा, दारू पिऊन वाहन चालवितो, यमराज त्यांना हाक मारतो, सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या स्वतः बरोबर इतरांनाही जगण्याची संधी द्या.

रहदारीचे नियम पाळा, उठसुठ होणारे मृत्यू टाळा. आवर वेगाला, सावरा जीवाला, उल्लंघन कराल रहदारी नियमांचे, अपंग व्हाल आयुष्यात कायमचे याबाबतचे हातात फलक घेवून वानवडी येथील क्रुट मेमोरीयल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वाहनचालकांमध्ये जनजागृती केली. निमित्ती होते वाहतूक सुरक्षा जनजागृती सप्ताह व एम्प्रेस गार्डन येथील लाल बहादुर शास्त्री जंक्शन वाहतूक सिग्नल उद्घाटनाचे. 

वानवडी वाहतूक शाखा व पुणे कॅन्टोंन्मेंट बोर्डातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर राजीव सेठी यांनी याच्या हस्ते सिग्नलचे उद्घाटन झाले. या सिग्नमुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी व वांरवार होणारे अपघात कमी होण्यास मदत होणार आहे. 

याप्रसंगी नगरसेविका किरण मंत्री, विनोद मथुरावाला, मंगला मंत्री, वानवडी वाहतूक विभागाचे पोलिस निरिक्षक जानमहंमद पठाण, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता विजय चव्हाण, सचीन खंडेलवाल, सहाय्यक पोलिस निरिक्षक किर्ती म्हस्के उपस्थित होते. 

Web Title: Marathi news pune news traffic rules awareness