प्रवाशांच्या सोयीसाठी सह्यांची मोहीम

संदिप जगदाळे
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

हडपसर (पुणे) : हडपसर-सोलापूर रस्ता आणि हडपसर-सासवड रस्ता या ठिकाणी एसटी थांबा असला तरीही त्या ठिकाणी प्रवाशांना बसण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे अनेक प्रवासी रस्त्यावर किंवा फूटपाथवर बसतात, ऊन आणि पाऊस यांच्यापासून संरक्षण व्हावे आणि प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करावी तसेच मोबाईल टॉयलेटची उभारणी करण्यात यावी म्हणून माणुसकी फाउंडेशन आणि इंन्कलाब या संस्थाच्या वतीने रविदर्शन आणि हडपसर गाडीतळ येथे सह्यांची मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. एकूण ९०० नागरिकांच्या सह्या या दिवसभर चाललेल्या मोहिमेत गोळा करण्यात आल्या. जमा झालेल्या सह्यांचे निवेदन येत्या शनिवारी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे देणार असल्याची माहिती माणुसकी फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रा.अमोल तोष्णीवाल आणि इंन्कलाबचे आशुतोष शिपलकर यांनी दिली. माणुसकी फौंडेशन आणि इंकलाब संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्‍य या मोहिमेत सहभागी झाले होते.

Web Title: Marathi news pune news travelers signs infrastructure campaign