वृक्षारोपण करुन घेतला सरपंच पदाचा पदभार

संतोष आटोळे
बुधवार, 10 जानेवारी 2018

शिर्सुफळ : मेडद (ता.बारामती) येथील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच डॉ. उज्वला पांडुरंग गावडे यांनी पर्यावरणाचा ढासळता समतोल राखण्यासाठी,  सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत सरपंच पदाचा पदभार घेताच वृक्षारोपण करीत एका वेगळ्या उपक्रमांची सुरवात केली. तसेच प्रत्येक रविवारी गावात दोन तास स्वच्छतेसाठी उपक्रम राबविण्याचा निर्धार केला.

मागील महिन्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बारामती तालुक्यातील मेडद ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतून पहिल्या सरपंच होण्याचा मान डॉ. उज्वला पांडुरंग गावडे यांना मिळाला. त्यांनी सामाजिक उपक्रम राबवित आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी गावडे हॉस्पीटलच्या माध्यमातून नारळाच्या तसेच फुलांच्या रोपांसह ट्रिगार्ड देण्यात आले. यामध्ये गावातील युवक, आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच बारामती मधील विद्या प्रतिष्ठानच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होत वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी बोलताना सरपंच डॉ. उज्वला गावडे म्हणाल्या मतदारांनी मोठा विश्वास ठेवून मला भरघोस मतांनी निवडून दिले आहे. या संधीच्या माध्यमातून गावविकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

Web Title: Marathi news pune news tree plantation