संक्रांतीनिमित्त आदिवासीं भगीनींना साडीवाटप

रामदास वाडेकर
शनिवार, 13 जानेवारी 2018

वाहनगावचे ग्रामदैवत काळूबाई देवी मंदीराच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला, थ्रिसेनक्रुप  कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल गोडसे, कंपनीचे अधिकारी सोमनाथ माने, संजीव येळगे,रविंद्र कामथे,वर्षा येळगे, अश्विनी माने, तृप्ती कामथे, माजी सरपंच निवृत्ती वाडेकर, बळीराम वाडेकर, गुलाब तनपुरे, पंढरीनाथ तनपुरे आदि उपस्थितीत होते. 

टाकवे बुद्रुक : मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पिंपरीतील थ्रिसेनक्रुप लिमिटेडच्या वतीने आंदर मावळातील वाहनगाव, कुसवली, शंकरवाडीतील आदिवासी पाडयावरील सुमारे शंभर महिलांना साडी वाटप केले. सणासुदीच्या दिवसात मिळालेल्या साडयांनी आदिवासीं भगीनींच्या चेहर्‍यावर स्मित झळाळले.

वाहनगावचे ग्रामदैवत काळूबाई देवी मंदीराच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला, थ्रिसेनक्रुप  कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल गोडसे, कंपनीचे अधिकारी सोमनाथ माने, संजीव येळगे,रविंद्र कामथे,वर्षा येळगे, अश्विनी माने, तृप्ती कामथे, माजी सरपंच निवृत्ती वाडेकर, बळीराम वाडेकर, गुलाब तनपुरे, पंढरीनाथ तनपुरे आदि उपस्थितीत होते. 

मागील दोन वर्षांपूर्वी सकाळने आदिवासी पाडयावरील आदिवासी बांधवांच्या समस्या मांडल्या होत्या, रोजगाराचा प्रश्न, रहायला हक्काचे घर नाही, की थंडीत पांघरूण नाही. याची दखल घेऊन मागच्या वर्षी थ्रिसेनक्रुपने निगडे, आंबळे, माऊ,फळणे या कातकरी पाडयावर ऊबदार कपडे वाटली होती. मागील वर्षाचा कित्ता गिरवित या वर्षी या पाडयावरील महिलांची गरज ओळखून व महिलांच्या मागणी  प्रमाणे प्रत्येक महिलेला तीन साड्यांचे वाटप करण्यात आले.

आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सकाळचे बातमीदार रामदास वाडेकर यांनी या बाबत पुढाकार घेतला आहे, केवळ शैक्षणिक साहित्याच्या अभावी या पाडयावरील शून्य ते सहा वयोगटातील बालक शाळा बाह्य राहू नये यासाठी देखील थ्रिसेनक्रुपच्या वतीने शैक्षणिक किट देण्याचे आश्वासन कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल गोडसे यांनी दिले.शिक्षण,आरोग्य आणि आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीची मदत मिळेल असा विश्वास इतर अधिकाऱ्यांनी दिला. 
आदिवासी महिलांनी मनातील न्यूनगंड काढून, मुलांना शिकवा त्याच बरोबर मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी प्रयत्न करा, आमची सोबत तुमच्या बरोबर आहे असे येळगे, माने, कामथे या महिला प्रतिनिधींनी सांगीतल्यावर आदिवासी महिलांनी टाळ्या वाजवून दाद दिली. खरेदी विक्री संघाचे संचालक मारूती खांडभोर यांनी प्रास्ताविक केले. काळूराम वाडेकर यांनी सुत्रसंचालन केले. बजरंग हिलम यांनी आभार मानले. 

Web Title: Marathi news Pune news tribal women