आणखी एका नकोशीला मातेने सोडले

संदीप घिसे 
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

निलम गायकवाड या कामावर जाण्यासाठी सकाळी 9.15 वाजता पिंपरी रेल्वे स्टेशन येथे आल्या असता त्यांना एक महिन्याचे स्त्री जातीचे बाळ रेल्वे स्टेशनवर आढळून आले.

पिंपरी (पुणे) : हिंजवडी येथे तीन दिवसाच्या नकोशीला मातेने सोडून पलायन केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना पिंपरी रेल्वे स्टेशन येथे शुक्रवारी सकाळी घडली.

निलम गायकवाड या कामावर जाण्यासाठी सकाळी 9.15 वाजता पिंपरी रेल्वे स्टेशन येथे आल्या असता त्यांना एक महिन्याचे स्त्री जातीचे बाळ रेल्वे स्टेशनवर आढळून आले.

Baby Girl with Nilam Gaikwad

बाळाजवळ दुधाची बाटली, स्वेटर आणि कपड्याचा जोड आढळून आला. गायकवाड यांनी मातेबाबत चोकशी केली असता आई सापडली नाही. त्यामुळे त्यांनी बाळाला पिंपरी रेल्वे पोलिसाकडे सुपूर्द केले.

 

आणखी बातम्या वाचण्यासाठी - 

चार तासांपूर्वी जन्मलेल्या अर्भकाला रस्त्यावर सोडून आई फरार

म्हसोला येथे स्त्रीचे अर्भक सापडल्याने खळबळ

काटेरी झुडपात पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत अर्भक आढळले

नदाफ दांपत्य बनले अनाथांचे आई-बाबा!

Web Title: Marathi news pune news unwanted baby girl