वालचंदनगरमध्ये पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात मनसेचे आंदोलन

राजकुमार थोरात
सोमवार, 29 जानेवारी 2018

वालचंदनगर : सतत वाढणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढी विरोधात वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दुचाकी चालवत नेण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले. केंद्रात व राज्यामध्ये भाजप सरकार आहे. या सरकारच्या कार्यकाळामध्ये पेट्रोल व डिझेलची दरवाढ सतत होऊ लागली आहे. 

आज पेट्रोलचा दर 81 रुपये 11 पैसे व डिझेलचा दर 67 रुपये 45 पैसे उच्चांकी झाला आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे महागाई वाढत चालली आहे. सर्वसामान्य नागरिकांना दुचाकीवाहने वापरणे ही अवघड झाले आहे. पेट्रोल व  डिझेलच्या दरवाढीचा शेतकरी,व्यापाऱ्यांना फटका बसत असून सतत वाढणारे पेट्रोल व डिझेलचे दर रोखण्यासाठी केंद्र व राज्यसरकार अपयशी झाले असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सरकारचा निषेध करण्यात आला. 

वालचंदनगरमध्ये मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुचाकी चालवत नेण्याचे अनोखे आंदोलन केले. आंदोलनामध्ये मनसेचे वालचंदनगर शहराचे अध्यक्ष संतोष भिसे, जिल्हाचे उपाध्यक्ष प्रदीप रकटे, रोहित सोनवणे, सोमनाथ धायगुडे, सुरज वाघमारे, निखिल हुलगे, रवी लोंढे, नंदू गायकवाड, चेतन सावंत, भैय्या बनसोडे, सुजित माने, प्रमोद कांबळे, दादा चव्हाण सहभागी झाले होते.

Web Title: Marathi news pune news valchandnagar petrol diesel price agitation