समुहगीत व लोकनृत्य स्पर्धेत विद्या प्रतिष्ठानला यश

संतोष आटोळे 
शनिवार, 6 जानेवारी 2018

शिर्सुफळ : माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 77 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हा स्तरावरील शरद मल्हार समूह गीत स्पर्धेत बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थी समुहाने यश मिळवित आपली विजयी घोडदौड कायम राखली. वानवडी पुणे येथील महात्मा फुले सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या समुह गीत स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावीच्या मोठ्या गटात विद्या प्रतिष्ठानच्या मराठी माध्यमिक शाळेतील 24 विद्यार्थ्यांच्या समुहाने सहभाग घेतला. यावेऴी त्यांनी गायलेल्या "जगी घुमवारे, दुमदुमवा रे' या समुहगीताने पहिला क्रमांक पटकाविला.

शिर्सुफळ : माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 77 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हा स्तरावरील शरद मल्हार समूह गीत स्पर्धेत बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थी समुहाने यश मिळवित आपली विजयी घोडदौड कायम राखली. वानवडी पुणे येथील महात्मा फुले सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या समुह गीत स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावीच्या मोठ्या गटात विद्या प्रतिष्ठानच्या मराठी माध्यमिक शाळेतील 24 विद्यार्थ्यांच्या समुहाने सहभाग घेतला. यावेऴी त्यांनी गायलेल्या "जगी घुमवारे, दुमदुमवा रे' या समुहगीताने पहिला क्रमांक पटकाविला. तर इयत्ता पाचवी ते सातवीच्या लहान गटात 32 विद्यार्थ्यांच्या समुहाने म्हटलेल्या "अजिंक्य भारत अजिंक्य जनता' या गीताला द्वितीय क्रमांक मिळाला. यामध्ये मोठ्या गटाला 11 हजार रुपये रोख व छोट्या गटाला 9 हजार रुपये रोख ,सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन शाळेचा व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेत समूह गीताला सिंथेसायजरवर समर्थ भोईंटे यांनी तर तबल्यावर आओम गोसावीने साथ दिली. 
               
तसेच पुणे येथील गणेश कला क्रिडा मंच येथे झालेल्या जिल्हा स्तरावरील शरद मल्हार लोक नृत्य स्पर्धेतही शाळेने आपला सहभाग नोंदवला. यामध्ये मोठ्या गटात सादर केलेल्या "होळी नृत्य' साठी प्रथम क्रमांक मिळाला त्यांनाही रोख 11 हजार रुपये सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन विद्यार्थी व शाळेचा गौरव करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील संगीत शिक्षिका तृप्ती सावंत व संगीत शिक्षक प्रशांत शिंदे यांनी मार्गदर्शन केले होते. यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन विद्या प्रतिष्ठान संस्थेचे सर्व विश्वस्त व पदाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रागिणी तावरे, उपमुख्याध्यापक रामचंद्र शिंदे व पर्यवेक्षक अर्जुन हिवरकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

 

Web Title: Marathi news pune news vidya pratishthan wins in singing and dancing competition