वालचंदनगरमधील युवकाला लंडनमध्ये मास्टर ऑफ सायन्स पदवी

राजकुमार थोरात
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

सध्या शिंदे याचे शिक्षण पूर्ण झाले असून लंडन विद्यापीठाचे व्हाईस चान्सेलर प्रोफेसर पौल बोयले यांच्याहस्ते मास्टर ऑफ सायन्स पदवी बहाल करण्यात आली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने जिद्दीने परदेशामध्ये शिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

वालचंदनगर : वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील विशाल विठ्ठल शिंदे या सेवानिवृत्त कामगाराच्या मुलाने लंडन येथील लिसेस्टर या विद्यापीठातुन इंजिनिअरिंग क्षेत्रातील मास्टर ऑफ सायन्स पदवी मिळवली आहे.

विशाल शिंदे याचे वडिल येथील वालचंदनगर कंपनीमध्ये कार्यरत होते. विशाल माध्यमिक शिक्षण येथील वर्धमान विद्यालयामध्ये झाले. संगमनेर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधून मॅकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर परदेशात उच्च शिक्षण घेण्याची सुरवातीला जर्मनीमधील विद्यापीठामध्ये अर्ज केला होता. जर्मनतील विद्यापीठामध्ये प्रवेश ही मिळाला होता. मात्र परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी येणारा खर्च परवडणारा नसल्यामुळे जर्मनीला शिक्षणासाठी जाता आले नाही. त्यानंतर शिंदे यांनी नाशिकमधील खासगी कंपनी व पुणे येथे लेक्चरचे काम करुन २०१६ मध्ये लंडन येथील लिसेस्टर विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला.

सध्या शिंदे याचे शिक्षण पूर्ण झाले असून लंडन विद्यापीठाचे व्हाईस चान्सेलर प्रोफेसर पौल बोयले यांच्याहस्ते मास्टर ऑफ सायन्स पदवी बहाल करण्यात आली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने जिद्दीने परदेशामध्ये शिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

Web Title: Marathi news Pune news Vishal Shinde success story