युवकांच्या सहभागातून ग्रामविकास : विश्‍वास नांगरे-पाटील 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

पुणे : ''ग्रामीण महाराष्ट्रात रचनात्मक आणि सकारात्मक बदल घडविण्यासाठी ग्रामपरिवर्तक म्हणून काम करणाऱ्या युवकांचा सहभाग हा बदलांचे संक्रमण घेऊन येईल. बदल घडविण्याचे सामर्थ्य आणि परिस्थितीचा स्वीकार करण्याचे धैर्य हेच महाराष्ट्राच्या ग्रामपरिवर्तनासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल,'' असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केले. 

यशदा येथे झालेल्या मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिपच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात नांगरे-पाटील यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत अकरा जिल्ह्यातील दीडशेहून अधिक ग्रामपरिवर्तक सहभागी झाले होते.

मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान (एमव्हीएसटीएफ) अंतर्गत हे ग्राम परिवर्तक गावागावांमध्ये जाऊन काम करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी, कृषी आयुक्त सचिन प्रताप सिंग, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, नंदुरबारचे जिल्हाधिकारी एम. एस. शेट्टी, निवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट, अविनाश धर्माधिकारी, यशदाचे संचालक अजय सावरीकर, रामनाथ सुब्रमण्यम यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. 

नांगरे-पाटील म्हणाले, ''एमव्हीएसटीएफ'मुळे लोकसहभाग आणि खासगी कंपन्या यांच्या एकत्रित प्रयत्नातून शासकीय योजनांची तातडीने अंमलबजावणी करणे शक्‍य होणार आहे. गावपातळीवर काम करताना ग्रामस्थांशी संवाद साधून मूळ समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा. लोकसहभागातून मिळणाऱ्या सकारात्मक पाठिंब्याचा स्वीकार करा, काम करताना निराश होऊ नका. ग्रामपरिवर्तनातूनच समाज बदल घडू शकतो, त्यात तुमचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.'' 

या वेळी विविध सादरीकरणे व केस स्टडीजच्या माध्यमातून समस्या, भावी योजना व कामाचे स्वरूप याबाबत या ग्रामपरिवर्तकांना मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण महाराष्ट्रात काम करताना ग्रामपरिवर्तकांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले आहेत व संबंधित गावांमधील भावी विकासासाठी मार्गदर्शन करण्यासाठी या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सुब्रमण्यम यांनी सांगितले.

Web Title: marathi news Pune News vishwas nangare patil