पुणे - हडपसरमध्ये विठ्ठलराव शिवरकर स्मृतिदिन साजरा

संदिप जगदाळे
शुक्रवार, 9 मार्च 2018

हडपसर (पुणे) : माजी आमदार कै.विठ्ठलराव शिवरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान, वानवडी गांव व विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी एम्प्रेस गार्डनचे सचिव सुरेशरावजी पिंगळे, श्रीकांत शिरोळे, विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर, सचिव चंद्रकांत ससाणे , नगरसेवक अशोक कांबळे, वानवडी गांवचे सरपंच दत्तोबा जांभूळकर, माजी नगरसेविका कविताताई शिवरकर, सुमनताई फुले उपस्थित होते.

 कविताताई शिवरकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कै.विठ्ठलराव शिवरकर यांनी व्यवहार ज्ञान व बुद्धी कौशल्य यांच्या जोरावर अनेक समस्या सोडवल्या. स्वत: अशिक्षित असूनही कोणीही ज्ञानापासून वंचित राहू नये या प्रेरणेतून शाळा उभारणीचे कार्य केल्याचे सांगितले. तसेच १० मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.

कै.विठ्ठलराव शिवरकर हे कडक शिस्तीचे व तत्वांचे कठोर पालन करणारे होते, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी मोठे होऊन राजकारण न करता समाजकारण करावे व जाती द्वेषापासून दूर रहावे, असा मोलाचा संदेश दिला. तसेच महिलांनी स्वत: ला कधीही कमी लेखू नये, मनापासून कष्ट केल्याने व जीवनात मोठ्या व्यक्तींचा आदर्श ठेवल्याने यश प्राप्त होते असे सांगितले.

याप्रसंगी सन्मित्र बँकेचे चेअरमन सुनीलजी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सोपानराव शिवरकर, नगरसेविका विजयाताई वाडकर, मायाताई ससाणे, लक्ष्मीबाई शिवरकर, सोनाली परदेशी, डॉ. स्नेहा शिवरकर, गौरी धारीवाल, सतिश गवळी, दीपक केदारी, भाऊ जांभूळकर, रमेश जांभूळकर, रमेश काकडे, बाबुराव मोरे, सुदाम चौगुले,पोपट जांभूळकर, कदम, पाटील, सुर्यकांत देडगे, दिलीपजी रसाळ, विद्यालयाचे प्राचार्य लहू वाघुले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी केले. सूत्रसंचालन विद्यालयाचे प्राचार्य लहू वाघुले यांनी मानले.
 
Web Title: Marathi news pune news vitthal raw shivarkar birth anniversary