स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जगावे - आ. बाबुराव पाचर्णे

जनार्दन दांडगे
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

लोणी काळभोर (पुणे) : "उठा जागे व्हा, ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका" असा महामंत्र देणारे स्वामी विवेकानंद व स्वराज्याच्या उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी जीवन जगणे अपेक्षित आहे असे मत आमदार बाबुराव पाचर्णे यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे व्यक्त केले. लोणी काळभोर येथील स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था संचालित पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शुक्रवारी (ता. १२) स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'स्वामी विवेकानंद जयंती साप्ताहा'च्या सुरुवातीला पाचर्णे बोलत होते.

लोणी काळभोर (पुणे) : "उठा जागे व्हा, ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका" असा महामंत्र देणारे स्वामी विवेकानंद व स्वराज्याच्या उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी जीवन जगणे अपेक्षित आहे असे मत आमदार बाबुराव पाचर्णे यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे व्यक्त केले. लोणी काळभोर येथील स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था संचालित पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शुक्रवारी (ता. १२) स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'स्वामी विवेकानंद जयंती साप्ताहा'च्या सुरुवातीला पाचर्णे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर होते. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती प्रतापआण्णा गायकवाड, शिक्षण सल्लागार मंडळाचे अध्यक्ष प्रशांत काळभोर, उपसरपंच योगेश काळभोर, साधना बँकेचे संचालक सुभाष काळभोर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज काळभोर, इंग्लीश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक जी. एस. माने, कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सरोज पाटील उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ, डॉ. बापुजी साळुंखे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी पाचर्णे म्हणाले,"स्वामी विवेकानंदांची जयंती देशभरामध्ये 'युवक दिन' म्हणून साजरी केली जाते. देशाला महासत्ता बनविण्यासाठी देशातील तरुणाने शिकले पाहिजे असे मत स्वामी विवेकानंद यांनी मांडले होते, ते आजही तितकेच खरे आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी वाटचाल करणे गरजेचे आहे."कार्यक्रमाचे प्रास्ताविक पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूलचे प्राचार्य एस. एम. गवळी यांनी केले. यावेळी विद्यार्थांनी स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ व संस्थेचे संस्थापक बापुजी साळुंखे यांची वेशभूषा केली होती.
 

Web Title: Marathi news pune news vivekanand and rajmata jijau birth anniversary in loni klabhor