इंदापूर तालुक्यासाठी टंचाई निवारणासाठी ३ कोटी २१ लाख रुपयांची तरतूद

Pravin Mane
Pravin Mane

वालचंदनगर : पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन इंदापूर तालुक्यामध्ये टंचाई निवारण्यासाठी  ३ कोटी २१ लाख रुपयांच्या निधीची तरतुद केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी आमदार दत्तात्रेय भरणे व सभापती प्रवीण माने यांच्याकडे उन्हाळ्यामधील संभाव्य पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी उपायोजना करण्याची मागणी केली होती.

नागरिकांच्या मागणीप्रमाणे माने यांनी  टंचाईचा आराखाडा तयार केला असून यामध्ये तालुक्यातील ९८ वाड्यावस्त्यांवर नव्याने विंधन विहिर खोदण्यासाठी ४९ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. वरकुटे येथील बनकरवाडी येथे नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी १० लाख, कळस येथील बिरंगुडीच्या नळयाेजना दुरुस्ती साठी ५ लाख, कौठळी येथील खामगळवाडीच्या नळदुरुस्तीसाठी ७ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

सणसर जवळी ३९ फाटा,कळंब जवळील सांधा चाळ, लोहारवस्ती,निरवांगी येथील  पाटीलवस्ती,मानेवस्ती व बोराटवाडी येथील सुद्रिकवस्ती प्राथमिक शाळेच्या परीसरातील विंधनविहिरी दुरुस्तीसाठी दीड लाख रुपयांची तरतुद केली आहे.

तालुक्यातील २४ वाड्या व १३ गावामध्ये टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी ७१ लाख ६० हजार रुपयांची तरतुद करण्यात आली अाहे. तसेच पाच विहिरींच्या अधिग्रहणासाठी १.६८ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. तसेच एकात्मिक पाणी व्यवस्थापन कार्यक्रमातंर्गत  रुई,वालचंदगर बाजारपेठ, कळस, बोरी, बंडगरवाडी, गोंदी, ओझरे, शेळगाव, बांडेवाडी (पळसदेव), रुई गावातील मरडवाडी , थोरातवाडी ,विठ्ठलवाडी देवस्थान ,बाबीरवुवा देवस्थान , नंदिकेश्‍वर देवस्थान (दगडवाडी),  पोंदकुलवाडी (बिजवडी) , पिठेवाडी, चव्हावस्ती (जांब) या १६  गावामध्ये पाणी पुरवठा योजना,नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती,पाण्याच्या टाकी बांधण्यासाठी  १ कोटी ७५ लाख, ५५ हजार रुपयांची तरतुद केली असल्याची माहिती माने यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com