... अन् भिंती बोलू लागल्या

दिलीप कुऱ्हाडे
शनिवार, 30 डिसेंबर 2017

शहर विद्रुपीकरणाचा कायदा कागदावरच !
उच्च न्यायालयाच्या आदेशाने शहरात बॅनर, फ्लेक्स, अापली जाहिरात करण्यासाठी भिंती रंगविणाऱ्यांवर शहर विद्रपीकरणाच्या कायद्या अंतर्गत खटला दाखल होतो. यावर देखरेख ठेवण्यासाठी न्यायालयाने आयुक्तांची नेमणूक केली आहे. हे आयुक्त क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेऊन तक्रार करण्यासाठी सुचना देतात. मात्र हे आयुक्त सध्या अदृश्‍य झाले आहेत. नागरिक सुद्धा पोलिस ठाण्यात जाऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करून शकतात.

पुणे : येरवड्यातील मुख्य रस्त्यांवरील भिंतीवर पुण्यातील पर्यटनस्थळे, मंदिरे, वाडे, ब्रिटीशकालीन वास्तूंची चित्र रेखाटले जात आहेत. या चित्रांच्या माध्यमातून जणू भिंती बोलू लागल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांसह पर्यटकांना पुण्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्राचे जणून दर्शनच होताना दिसते. 

येरवड्यासह शहरातील मुख्य रस्त्यांवर रस्त्यावरील भिंतीवर ऐतिहासिक बंडगार्डन पुल, लाल देऊळ, महात्मा फुले वाडा, आगाखान पॅलेस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची इमारत, शनिवारवाडा, पाताळेश्‍वर, सारसबाग, पर्वती अशा पर्यटन स्थळांची, मंदिरांची, वाड्यांची आणि ब्रिटीशकालीन वास्तूंची हुबेहुब चित्रे रेखाटली जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रातील प्रगतीच्या पाऊल खुणा उलगडताना दिसतता. त्यामुळे येथील चित्रे नागरिकांना नेत्र सुखाबरोबरच शहराच्या सौदर्यात भरत घालताना दिसत आहेत. 
या रस्त्यावरील भिंतीवर येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने सुरवातीला निसर्गचित्रांबरोबरच सुविचार रंगविले जात होते. याची जागा आता पुण्यातील विविध वास्तूंनी घेतल्यामुळे या भिंतीजणू येणाऱ्या जाणाऱ्यांबरोबर बोलू लागले आहेत. पालकांना आपल्या पाल्यांना या चित्रांच्या माध्यमातून पुणे शहराची महिती सांगणे सोपे होणार आहे. त्यामुळे पाल्य ही स्थळे प्रत्यक्षात पाहण्यास हट्ट करणार नाहीत तर नवलच म्हणावे लागले.

महापालिका मालकीच्या इमारती व वास्तूंवर जाहिराती करण्यास प्रतिबंध करणे अावश्‍यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. महापालिकेच्या शाळा व समाजमंदिर, रुग्णालय, दवाखाने, रस्त्यावरील सीमाभिंतीवर अनेकजण आपल्या जाहिराती करण्यासाठी वापरतात.यामध्ये राजकीय पक्ष सुद्धा मागे नसतात. अनेक व्यवसायिक पोस्टर, माहितीपत्रकांपासून ते बॅनर सर्रास लावतात. त्यांच्यावर क्षेत्रीय कार्यालय कारवाई करताना दिसत नाही. 

शहर विद्रुपीकरणाचा कायदा कागदावरच !
उच्च न्यायालयाच्या आदेशाने शहरात बॅनर, फ्लेक्स, अापली जाहिरात करण्यासाठी भिंती रंगविणाऱ्यांवर शहर विद्रपीकरणाच्या कायद्या अंतर्गत खटला दाखल होतो. यावर देखरेख ठेवण्यासाठी न्यायालयाने आयुक्तांची नेमणूक केली आहे. हे आयुक्त क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेऊन तक्रार करण्यासाठी सुचना देतात. मात्र हे आयुक्त सध्या अदृश्‍य झाले आहेत. नागरिक सुद्धा पोलिस ठाण्यात जाऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करून शकतात. स्थानिक पोलिस चौकी किंवा पोलिस ठाणे अशा तक्रारी घेण्याची टाळाटाळ करताना दिसतात.त्यामुळे मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी असा प्रश्‍न क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना पडला आहे. 

Web Title: Marathi news Pune news wall painting in Yerwada