पुणे - रोकेम कचरा प्रकल्प दहा दिवस बंद

संदिप जगदाळे
शुक्रवार, 9 मार्च 2018

हडपसर (पुणे) : रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील महापालिकेच्या रोकेम कचरा प्रकल्पास आग लागल्याने कचर्यावर प्रक्रीया करण्याचे काम थांबले आहे.
त्यामुळे पुढील दहा दिवस हा प्रकल्प बंद राहणार आहे. त्यामुळे याठिकाणी
येणाऱ्या ४०० टन कचऱ्यावर प्रक्रीया करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. या प्रकल्पात कचऱ्यापासून आरडीएफ इंधन तयार केले जात होते. ते बंद झाल्याने आरडीएफ विकत घेणाऱ्या कंपनीची देखील गैरसोय झाली
आहे.

बुधवारी जेसीबीच्या माध्यमातून साठवलेले आरडीएफचे सपाटीकरण करताना जेसीबीमध्ये शॅार्ट सर्कीट झाले. त्यामुळे जेसीबीचा डिझेल टँक फूटुन मोठया
प्रमाणात आग लागली. ही आग विझविण्यासाठी आग्नीशामक केंद्राच्या पाच गाडयांनी दिवसभर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान कंपनीतील विविध मशनरी जळून खाक झाल्या. त्यामुळे महापालिकेला प्रकल्प बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

याबाबत घनकचरा विभागाचे प्रमुखे सुरेश जगताप म्हणाले, पुढील दहा दिवसात
प्रकल्पाची दुरूस्ती करून प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला
दिल्या आहेत. तोपर्यंत कंपनीच्या आवारील रॅंम्पवर कचरा साठविण्यात येत
आहे.

रोकेम कंपनीचे संचालक योगेश देशमुख म्हणाले, या आगीत सुमारे अडीच कोटी
रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीत अद्यावत मशीन जळाल्या आहेत. याबाबत
सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. जळालेले अनेक साहित्य इंर्पोटेड आहे,
त्यामुळे ते आणण्यास उशीर होणार आहे. जळालेले कनव्हेअर व बेल्ट चेन्नई
येथून आणले जाणार आहे. त्यामुळे प्रकीया न होणार्या कचऱ्याची व्यवस्था
पालिकेला करावी लागणार आहे.

Web Title: Marathi news pune news waste management project 10 days close