महिलांना पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

टाकवे बुद्रुक (पुणे) - तांत्रिक बिघाडामुळे आंदर मावळातील  कांब्रेतील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. गावालगतचे चढण चढून पाणी वाहून आणावे लागत असल्याने महिला संताप व्यक्त करीत आहेत. आठ दिवसांपासून पाणी येत नसल्याने महिला ठोकळवाडी धरणाच्या जलाशयातून डोक्यावर हांडे भरून आणायला लवकरच बाहेर पडावे लागत असल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. 

आंदर मावळाच्या पश्चिम भागातील चाळीस घराचे हे गाव, सह्याद्रीच्या पायथ्यालगत वसले आहे. गावाच्या उत्तरेला असलेल्या ठोकळवाडी धरणाची एक किलोमीटर उतरण उतरून खाली यायचे आणि तितकीच चढण चढून वर यायचे, त्यामुळे महिला संतापलेल्या आहे. तांत्रिक अडचण दूर करावी अशी माफक अपेक्षा महिला सह पुरूषांनी व्यक्त केली आहे. 

गावकरी महेंद्र आलम, संतोष कदम, लक्ष्मण आलम, पांडुरंग आलम आदिंनी पाण्याची नित्य पायपीट करावी लागत असल्याचे सांगत हा प्रश्न तातडीने मार्गी लागला पाहिजे अशी मागणी केली.

Web Title: marathi news pune news water crisis drought