रखडलेल्या शिर्सुफळ नळपाणी योजनेबाबत अजित पवारांनी घातले लक्ष

संतोष आटोळे 
गुरुवार, 8 मार्च 2018

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दै.सकाळ मध्ये मंगळवार (ता.06) शिर्सुफळ येथील नळ पाणीपुरवठा योजना गेल्या दोन वर्षापासुन रखडली. योजनेचे काम पूर्ण होऊनही अवैध वाळू उपशामुळे पाईपलाईनचे होत असलेल्या नुकसानीमुळे योजना कार्यान्वित करण्यात अडचण येत आहे. यामुळे तब्बल पावणे दोन कोट रुपये खर्चुनही शिर्सुफळकर पाण्यापासून वंचितच आहे.याबाबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालण्याची मागणी सचित्र प्रसिध्द केली होती.

शिर्सुफळ : शिर्सुफळ ( ता.बारामती) येथील अवैध वाळू  उपशामुळे पाईपलाईनचे नुकसान होत असल्याने रखडलेल्या  नळपाणी पुरवठा योजनेबाबत दै.सकाळ मध्ये सचित्र प्रसिध्द झाले. याची दखल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेत या प्रकरणी प्रांताधिकारी यांना लक्ष घालणेबाबत सुचना केली. त्यावरुन तात्काळ कार्यवाहीला सुरवात झाली. प्रांताधिकारी यांनी बुधवार ( ता.07) गावचे पदाधिकारी व अधिकारी यांची बैठक घेतली. व यापुढील यापुढी काळात अवैध वाळू उपसा करणारांवर कडक कारवाई करणे व नळ पाणीपुरवठा  योजना तात्काळ मार्गी लावण्याबाबत सुचना केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दै.सकाळ मध्ये मंगळवार (ता.06) शिर्सुफळ येथील नळ पाणीपुरवठा योजना गेल्या दोन वर्षापासुन रखडली. योजनेचे काम पूर्ण होऊनही अवैध वाळू उपशामुळे पाईपलाईनचे होत असलेल्या नुकसानीमुळे योजना कार्यान्वित करण्यात अडचण येत आहे. यामुळे तब्बल पावणे दोन कोट रुपये खर्चुनही शिर्सुफळकर पाण्यापासून वंचितच आहे.याबाबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालण्याची मागणी सचित्र प्रसिध्द केली होती. याची दखल घेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेवरुन त्यांचे स्वीय सहाय्यक सुनिलकुमार मुळे यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना याबाबत बैठक घेत तात्काळ  कार्यवाहीच्या सुचना केली.यानुसार आजच बुधवार (ता.07) रोजी प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजिन करण्यात आले. यामध्ये अवैध वाळू  वाहतुक रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे यासाठी तलाठ्यांचे पथक नेमण्यात येणार आहे. तसेच पोलिसांच्याकडुनही तपासणीसाठी दररोज गस्त घालण्यात येणार आहे. त्याबरोबरच अवैध वाळू वाहतुक करणारा सापडल्यास संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखर करण्यात येणार आहे.यासाठी ग्रामस्थांनीही पुढाकार घेण्याचे तसेच कोणत्याही प्रकारे स्थानिक पुढाऱ्यांनी वाळू  माफियांनी अभय न देता त्यांचे नाव व गाडीनंबर कळवावेत  असे आवाहन केले.

यावेळी सुनिलकुमार मुसळे, तहसिलदार हनुमंत पाटील, पोलिस निरीक्षक एस.आर.गौड, पंचायत समिती  बारामतीचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कोकरे, मंडलाधिकारी एम.पी.सय्यद, पाणीपुरवठा समिती अध्यक्ष हनुमंत मेरगळ, दुध संघाचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य अॅड.नितीन आटोळे, सदस्य विश्वास आटोळे, विजय आटोळे, सुखदेव हिवरकर, ठेकेदार विजय गावडे, तलाठी महेश वाघ, आदी उपस्थित होते.

Web Title: Marathi news Pune news water project