व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज टाकणाऱ्या दोघांवर गुन्हा

संदीप घिसे
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

विश्वनाथ निवृत्ती वाजे आणि राजेंद्र गोरख मोडवे (दोघेही रा. शिंदेवस्ती, रावेत) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस नाईक सुनील संपत जाधव यांनी याबाबत निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरी : मराठा समाजाबाबत व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मॅसेज टाकणाऱ्या दोन जणांवर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वनाथ निवृत्ती वाजे आणि राजेंद्र गोरख मोडवे (दोघेही रा. शिंदेवस्ती, रावेत) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस नाईक सुनील संपत जाधव यांनी याबाबत निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता.२७) दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास आरोपींनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.

याबाबत माहिती मिळताच लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी पोलिसांनी त्या दोघांच्या विरोधात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शंकर अवताडे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Marathi news Pune news whatsapp post crime