वायरमनचा मुलगा झाला सीए

जनार्दन दांडगे
बुधवार, 24 जानेवारी 2018

उरुळी कांचन (पुणे) : कोरेगाव मुळ (ता. हवेली) परिसरात खाजगी बांधकाम साईटवर वायरमन म्हणून काम करणाऱ्या कामगाराच्या मुलाने चार्टर्ड अकाऊंटंटच्या (सी. ए) पदवीला गवसणी घालण्याचा पराक्रम केला आहे. किसन तुळशीराम पांडुळे (सध्या रा. बोधे-काकडे वस्ती, कोरेगाव मुळ, ता. हवेली मुळ रा. महादेववाडी, ता. माढा, जि. सोलापूर) हे त्या चार्टड अकाऊंटंट (सनदी लेखापाल) झालेल्या मुलाचे नाव असून त्याचे वडील तुळशीराम पांडुळे हे कोरेगाव मुळ परिसरातील 'ड्रीम्स निवारा' या खाजगी बांधकाम कंपनीमध्ये मागील काही वर्षापासून वायरमन म्हणून काम करत आहेत.

तुळशीराम पांडुळे हे केवळ तिसरी इयत्ता शिकले असून त्यांची पत्नी रुक्मिणी अशिक्षित असून त्यांना दोन मुले आहेत. 1972 साली सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाने कवेत घेतल्यानंतर पांडुळे कुटुंबीय रोजीरोटीसाठी कोरेगाव मुळ परिसरात राहण्यास आले. सुरुवातीच्या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांकडे मोलमजुरी करताकरता त्यांनी काही दिवस याच भागातील पोल्ट्रीवर काम केले. पोल्ट्रीमध्ये काम करत असताना, त्यांना वायरमनचे जुजबी ज्ञान मिळाले. दरम्यानच्या काळात त्यांची मुले शाळेत जाऊ लागली होती. आपण शिकलो नाही तरी आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षण द्यायचे व त्यांना त्यांच्या पायावर उभे करायचे या निर्धाराने तुळशीराम पांडुळे व त्यांची पत्नीने रुक्मिणी मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेतला. 

आपल्या आईवडिलांची तळमळ पाहून किसन यानेही आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी अभ्यास सुरू केला. यातूनच नोव्हेंबर 2017 च्या चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेत किसनने यश मिळवले. सोलापूर सारख्या दुष्काळी परिस्थिती असलेल्या व कोरेगाव मुळ परिसरात मोलमजुरी करणाऱ्या पांडुळे दाम्पत्याच्या मुलाने चार्टड अकाऊंटंट परीक्षेत यश मिळल्याने गावकरीही किसनवर खुश आहेत. तर आपल्या मुलाने एवढ्या मोठ्या परीक्षेत यश मिळविल्याबद्दल किसनचे आईवडीलांनाही आपल्या मुलाबद्दल गौरवाची भावना आहे.

यशाबद्दल बोलताना किसन म्हणाला,"माझे आई वडील शिकले नसले तरी त्यांनी आमच्या शिक्षणासाठी खूप मोठे कष्ट घेतले आहे. रात्रंदिवस कष्ट करून माझ्या आईवडिलांनी आमच्या शिक्षणाचा खर्च भागविला आहे. माझे यश त्यांच्या संघर्षाला अर्पण आहे. यापुढील काळात चार्टर्ड अकाऊंटंट'च्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याबरोबर आई-वडिलांची सेवा करणार आहे."
 
Web Title: Marathi news pune news wire mans sons become CA