अपर्णा डोके व इंदिरा अस्वार-डावरे यांना कर्तृत्ववान स्त्रीगौरव पुरस्कार

पराग जगताप
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

जुन्नर : पिंपरीपेंढार ता.जुन्नर येथिल कौसल्याताई जाधव स्मृती ट्रस्टतर्फे पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर व विद्यमान नगरसेविका अपर्णा डोके यांना व पंचायत समिती खेडच्या गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार-डावरे यांना कर्तृत्ववान स्त्रीगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

याबाबत मुख्य संयोजक गणेश जाधव म्हणाले की, कौसल्याताई जाधव यांच्या सातव्या स्मृती दिनानिमीत्त पिंपरीपेंढार येथे विविध उपक्रम राबविण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे देवदत्त निकम, माजी नगरसेविका पिंपरी चिंचवड शशीकला डोके, जि.प.सदस्य पांडुरंग पवार, अशा बुचके, मोहित ढमाले, शरद बँक संचालक विनायक तांबे, किशोर दांगट, वैभव 
तांबे, विलास दांगट, आनंद रासकर, गौरी बेनके, संगिता वाघ, अनघा घोडके, उज्वला शेवाळे, रंजना काळे, सुरेखा वेठेकर, अंजली खैरे, सुप्रिया लेंडे, निलीमा हुल्याळकर, कुंदा इचके, योगिता खैरे, सविता वाघ व किसन कुटे हे व इतर मान्यवर उपस्थित होते.

या निमीत्त चाकण येथिल युनिकेअर हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित केलेल्या मोफत ह्रदयरोग चिकित्सा शिबीरात डॉ. अमोल बेनके व डॉ.पल्लवी बेनके यांच्या पथकाने 75 रुग्णाची तपासणी केली.तसेच यावेळी पुणे येथिल समाजप्रबोधनकार शारदा (आक्का) मुंडे यांचे आई या विषयावर व्याख्यान झाले. ट्रस्टचे अध्यक्ष महेंद्र जाधव यानी प्रस्ताविक केले, विठ्ठल शितोळे व गणेश जाधव यानी सूत्रसंचालन केले तर संस्थापक विजय जाधव यानी आभार मानले.

Web Title: Marathi news pune news women award