७५ वर्षांच्या कर्णबधिर महिलेला सोडले पदपथावर

दिलीप कुऱ्हाडे
बुधवार, 31 जानेवारी 2018

ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारागृह
केंद्र व राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिक कायद्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात शेल्टर्स हाऊस उभारले आहेत. मात्र यामध्ये अनाथ, निराधारांनाच ठेवता येते. नातेवाईकांनी विशेषत: मुला-मुलींनी ज्येष्ठ नागरिकांना बेघर केल्यास त्यांना शिक्षा होऊ शकते. त्यांच्याकडून आई-वडिलांसाठी घरखर्च, वैद्यकीय खर्च मिळवता येऊ शकते,असे अॅड असुंता पारधे यांनी सांगितले.

पुणे : सायंकाळची वेळ होती....हिवाळा असल्यामुळे लवकर अंधार पडला होता... रिक्षातून आलेल्या अज्ञात व्यक्तीने हरिगंगा सोसायटीसमोरील पदपथावर ज्येष्ठ नागरिक महिलेला सोडून पळ काढला. या धावपळीच्या युगात येणाऱ्या जाणाऱ्यांनी तिच्याकडे पाहिले सुद्धा नाही... रात्री थंडी वाढताच कोणीतरी तिची चौकशी करून लागले. मात्र महिला कर्णबधिर असल्यामुळे त्यांना बोलताच येत नव्हते...त्यानंतर या महिलेचा नवीन नावाने जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला.

प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवसापूर्वी रिक्षातून 75 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक महिलेला आणून बेवारसपणे कोणीतरी सोडून गेले. अनेकजण त्यांची चौकशी करून लागले पण महिला कर्णबधिर असल्याचे लक्षात येताच सर्वांनी तेथून काढता पाय घेतला. सामाजिक कार्यकर्त्या व तनिष्का सदस्या सिंधूताई गोळे यांनी ज्येष्ठ नागरिक महिलेची अवस्था पाहून तत्काळ पोलिसांना संपर्क केले. पोलिसांनी सुरवातीला ज्येष्ठ नागरिक महिलेला कसे आणि कोठे ठेवायचे असे प्रश्‍न उपस्थित केले. 

गोळे यांनी महिला व बाल विकास अधिकारी शुभांगी झोडगे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सुद्धा ज्येष्ठ नागरिक महिलेला ठेवण्यासाठी नकार दिला. त्यांना ठेवायचे असेल तर न्यायालयाची परवानगी लागेल असे त्यांनी सांगितले.येरवडा पोलिसांनी त्या रात्री महिलेची राहण्याची व्यवस्था केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी न्यायालयात महिला भिक्षेकरी असल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने त्यांना भिक्षेकरी स्विकार केंद्रात ठेवण्याचे आदेश दिले. भिक्षेकरी कायद्या अंतर्गत महिलेचे छायाचित्र सुद्धा प्रसिद्ध करता येत नाही. महिलेची सुटका झाल्यानंतरच त्यांचे छायाचित्र घ्या असे झोडगे यांनी सांगितले. 

या संदर्भात चेतना महिला विकास केंद्राच्या अॅड असुंता पारधे म्हणाल्या, ‘‘ ज्येष्ठ नागरिक कायद्या अंतर्गत अशा ज्येष्ठांना निराधार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. संबंधित महिलेची तज्ज्ञ समुपदेशकाच्या मदतीने ओळख होऊ शकते. पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेऊन ज्येष्ठ नागरिक महिलेला ताब्यात द्यावे.’’ 

ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारागृह
केंद्र व राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिक कायद्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात शेल्टर्स हाऊस उभारले आहेत. मात्र यामध्ये अनाथ, निराधारांनाच ठेवता येते. नातेवाईकांनी विशेषत: मुला-मुलींनी ज्येष्ठ नागरिकांना बेघर केल्यास त्यांना शिक्षा होऊ शकते. त्यांच्याकडून आई-वडिलांसाठी घरखर्च, वैद्यकीय खर्च मिळवता येऊ शकते,असे अॅड असुंता पारधे यांनी सांगितले.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :
भाजपा म्हणते, राहुल गांधींचे जॅकेट 70 हजारांचे
आई-बाबा सांगा ना, आमची काय चूक...​
मृत तरुणी परत आल्याच्या अफवेने गोंधळ​
"हे राम' म्हटल्याबद्दलच्या विधानाचा विपर्यास​
सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारी रजा नको; न्यायालयाची सूचना​
विकासवृद्धीसाठी झेपावे निर्यातीकडे!​

श्रीमंत देशांत भारत सहावा; अमेरिका प्रथम
तनिष्कने केली 1045 धावांची नाबाद विश्‍वविक्रमी खेळी​
दोषींवर कडक कारवाई करू; आदित्यनाथ यांनी मौन सोडले​

 

Web Title: Marathi news Pune news women on footpath