चिंचवडमध्ये गरोदर महिलेची आत्महत्या

संदीप घिसे
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

लग्नानंतर अनेक दिवस शीतलला मूल होत नव्हते. पाच वर्ष औषध उपचार केल्यानंतर शीतल सध्या सात महिन्यांची गरोदर होती. ओटी भरणा करता सात महिन्यांची गरोदर असताना गावाला जावे असे तिच्या सासरकडील मंडळींचा म्हणने होते.

पिंपरी : राहत्या घरात गळफास घेऊन सात महिन्याच्या गरोदर महिलेने आत्महत्या केली. ही घटना चिंचवड येथे सोमवारी (ता.२६) सायंकाळी घडली.

शीतल अरुण पाटील (वय २४, रा. बिजलीनगर चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास शीतलने राहत्या घरात छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

लग्नानंतर अनेक दिवस शीतलला मूल होत नव्हते. पाच वर्ष औषध उपचार केल्यानंतर शीतल सध्या सात महिन्यांची गरोदर होती. ओटी भरणा करता सात महिन्यांची गरोदर असताना गावाला जावे असे तिच्या सासरकडील मंडळींचा म्हणने होते. मात्र शीतल नवव्या महिन्यात गावी जाण्यासाठी आग्रही होती. यावरून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या घरात वादविवाद सुरू होता. याच कारणावरून शीतलने सोमवारी सायंकाळी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली.  याबाबत अधिक तपास चिंचवड पोलिस करीत आहेत.

Web Title: Marathi news Pune news women suicide