आगळंबे यात्रेच्या आखाड्यात रंगणार महिलांच्या कुस्त्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

खडकवासला (पुणे) : आगळंबे गावच्या ऐतिहासिक श्रीमळाई देवीचा उत्सव मग पौर्णिमेच्या दिवशी असतो. मात्र, यंदा 31 जानेवारीला असलेल्या पोर्णिमच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण असल्याने यंदाचा उत्सव दोन दिवस अगोदर म्हणजे रविवार २८ जानेवारीपासून सुरू होत असून, देवीचा छबिना सोमवारी होईल, अशी माहिती आगळंबे देव देवेश्वर सेवा संस्थानचे अध्यक्ष प्रा. विजय पायगुडे यांनी दिली.

मागील वर्षीपासून यात्रेत महिलांचा कुस्त्यांचा आखड्याला सुरवात केली होते. यंदादेखील ती कायम राहणार आहे. तर यात्रेच्या पहिल्या दिवशी पशूहत्या करण्यास बंदी घालण्याचा निर्णय देखील संस्थानने यापूर्वी घेतला होता. तो यंदादेखील कायम राहणार आहे, असे संस्थानचे एकनाथ तिखे, गोकुळ लभडे रोहिदास पायगुडे यांनी सांगितले. "रविवारी पहाटे महाअभिषेक व आरती होणार आहे. संध्याकाळी महाप्रसाद रात्री हभप संगीता चोपडा यांचे कीर्तन होणार आहे. सोमवारी पहाटे महाअभिषेक व आरती होईल. संध्याकाळी रात्री आठ वाजता महिलांच्या उपस्थितीत पालखी छबिना व काठीची मिरवणूक निघणार आहे. ३० जानेवारी रोजी (मंगळवार) दुपारी 3 वाजता कुस्त्याचा आखाडा होईल. मागील वर्षीपासून महिलांच्या कुस्त्या आयोजित केल्या जातात.

यंदादेखील महिलांच्या कुस्त्या होणार आहेत. महिलांच्या निकाली कुस्तीसाठी सुनील ढमढेरे यांच्या स्मरणार्थ शिवाजी तागुंदे यांनी 51 हजार रुपयांचे बक्षीस व स्मृतिचिन्ह ठेवण्यात आले आहे.

Web Title: Marathi News Pune news women wrestling aaglambe gaon