आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी, प्रोत्साहन

राजेंद्रकृष्ण कापसे 
बुधवार, 14 मार्च 2018

खडकवासला (पुणे) : महिलांसाठी आता सरकारसह खासगी विविध क्षेत्रातील दारे खुले आहेत. कुटुंबियांच्या सहकार्याने आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी व प्रोत्साहन मिळत आहे. असे मत भारतीय महीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू अॅड. कमल सावंत यांनी व्यक्त केले. 

खडकवासला (पुणे) : महिलांसाठी आता सरकारसह खासगी विविध क्षेत्रातील दारे खुले आहेत. कुटुंबियांच्या सहकार्याने आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी व प्रोत्साहन मिळत आहे. असे मत भारतीय महीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू अॅड. कमल सावंत यांनी व्यक्त केले. 

गोऱ्हे बुद्रुक येथे समर्थ महीला गटाच्या वतीने महीला दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजित केला होता. त्यावेळी अॅड. सावंत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. 
यावेळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, जिल्हा परिषद सदस्य पुजा पारगे, शिवसेना महीला आघाडीच्या रेखा कोंडे, सरपंच सचिन पासलकर, माजी उपसरपंच सुशांत खिरीड, माजी उपसरपंच रोझी कुम्पट्टी, ग्रामपंचायत सदस्य सारीका भोरडे,  लहु खिरीड, कुंडलिक खिरीड,  संदीप खिरीड, उत्तम पारगे उपस्थित होते. 

मला क्रिकेटचा सराव करताना वडिलांच्या पासून लपून मी हे करीत होते. सराव करून जाताना कधी वडील लवकर घरी आले तर मला शेजारच्या घरात जाऊन सरावाचे कपडे बदलून साधी कपडे घालावे लागत होते. असे सांगून त्या म्हणाल्या, "आता ही परिस्थिती बदलली आहे. आता प्रत्येक कुटुंबात मुलीला शिक्षणासह, खेळ, नृत्य, व्यवसाय करीअर निवडण्याचा संधी उपलब्ध आहे. आपल्यावर असलेला कुटुंबाचा विश्वास असल्या पाहिजे. त्याचा फायदा तुम्ही घ्या, आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करा. मला राजकारणाची पार्श्वभूमीवर नसताना मला नागरिकांनी फक्त खेळाडू म्हणून मला विजयी केले होते."

या प्रसंगी सावंत यांनी स्वतःचे जीवन कसे घडवले महीलांनी प्राधान्य कशाला द्यावे. त्यांनी यावेळी स्व-संरक्षणाचे धडे देखील दिले. कोंडे यांनी शिवसेना प्रमुख आणि महीला संरक्षण हे समीकरण काय होते. ते आपल्या भाषणातून सांगितले. "चला, खेळू या मंगळागौर" हा कार्यक्रम खास आकर्षण ठरला. कार्यक्रमाच्या शुभेच्छा देण्यासाठी सिने अभिनेत्री अनुश्री जुन्नरकर उपस्थित होत्या. या प्रसंगी सुमारे ४०० महीला जमल्या होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन सुरेखा पारगे अध्यक्ष समर्थ महीला गट व मिना साळवी यांनी केले होते.

Web Title: Marathi news pune news womens day