महिलांनी संघटीतपणे घरासोबत परिसर विकासात योगदान द्यावे-अश्विनी जगताप

रमेश मोरे
सोमवार, 12 मार्च 2018

जुनी सांगवी (पुणे) : महिलांनी बचतगटाच्या माध्यमातुन सुरू केलेले संघटन मर्यादीत न राहता त्यातुन घराबरोबरच परिसराचा विकास साधण्यासाठी सर्वच स्तरावर हिरिरीने भाग घेवुन विकासाला महिलांनी हातभार लावावा, असे जुनी सांगवी सेथे जागतिक महिला दिनानिमित्त बालाजी महिला प्रतिष्ठाण व नगरसेवक हर्षल ढोरे यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या मोफत व्यावसायिक मार्गदर्शन मेळाव्यात प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अश्विनी जगताप यांनी बोलताना सांगितले.

जुनी सांगवी (पुणे) : महिलांनी बचतगटाच्या माध्यमातुन सुरू केलेले संघटन मर्यादीत न राहता त्यातुन घराबरोबरच परिसराचा विकास साधण्यासाठी सर्वच स्तरावर हिरिरीने भाग घेवुन विकासाला महिलांनी हातभार लावावा, असे जुनी सांगवी सेथे जागतिक महिला दिनानिमित्त बालाजी महिला प्रतिष्ठाण व नगरसेवक हर्षल ढोरे यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या मोफत व्यावसायिक मार्गदर्शन मेळाव्यात प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अश्विनी जगताप यांनी बोलताना सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, मी आमदार पत्नी असले तरी मी तुमच्यासारखीच गृहिणी देखील आहे. आपल्या परिसरातील कचरा, पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मी तुमच्या भाऊंना नक्कीच सांगेन असे ही त्या म्हणाल्या. जुनी सांगवी येथील बालाजी लॉन्स येथे जुनी सांगवी परिसरातील महिलांसाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी
स्मिता ढोरे यांनी महिलांना घरगुती व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले. तर दीपक जगताप यांनी आगीची खबरदारी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. तर युवा द स्किल हबच्या जयश्री खिलारे यांनी घरगुती व्यवसायाबद्दल महिलांना मार्गदर्शन केले. शिवयोद्धा मर्दानी आखाड्याच्या वतीने चित्तथरारक खेळांची प्रात्यक्षिके तरूणांनी सादर केली. तर शालिनी ग्रुपच्या वतीने  सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

यावेळी सांगवीतील २५ महिला बचत गटांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या रुग्णांविषयीच्या योजना निराधार, गरीब व गरजू रुग्णांपर्यंत पोहचविण्याचे काम करणाऱ्या संजय गांधी निराधार समितीच्या सौ. आदिती निकम यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात  आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक हर्षल ढोरे यांनी केले.ते म्हणाले, सांगवी प्रभागातील प्रत्येक समस्या व विकासात्मक काम करण्याच्या दृष्टीने मी आगामी काळात काम करत राहीन. माझ्या गुरूंचे मार्गदर्शन व आपल्या साथीत सांगवी परिसराचा विकास करायचा आहे.

यावेळी प्रतिभा महिला प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा अश्विनीताई लक्ष्मण जगताप, शुभांगी जगताप, उप महापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, नगरसेवक  हर्षल ढोरे, संतोष कांबळे, नगरसेविका माई ढोरे,शारदा सोनवणे, माधवी राजापूरे, चंदाताई लोखंडे, उषाताई मुंढे, आदी उपस्थित होते. सर्व नगरसदस्यांचा बालाजी महिला प्रतिष्ठानच्या वतीने सरस्वती मुर्ती व तुळशी रोप देवुन सत्कार करण्यात आला.तर कार्यक्रमा दरम्यान उपस्थित महिलांना दोन हजार हजार तुळशी रोपाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गौरी गायकवाड यांनी केले तर आभार अनुश्री हर्षल ढोरे यांनी मानले.

Web Title: Marathi news pune news womens day development