पुणे - महिलांसाठी तेजस्वीनी बस सुरू

संदिप जगदाळे
गुरुवार, 8 मार्च 2018

हडपसर (पुणे) : शहरी भागामध्ये नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या महिलांची वाढती संख्या आणि अपुऱ्या बसेसच्या फेऱ्यांमुळे होणाऱ्या त्रासापासून त्यांची सुटका करण्याच्या उद्देशाने पीएमपीएलने खास महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र बस सेवा सुरू केली. महिला दिनाचे औचीत्य साधून ही सेवा सुरू केल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला. गाडीतळ ते वारजे या मार्गावर रोज चार तेजस्वीनी बस धावणार आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांना सुरक्षिक प्रवास करता येणार आहे. गाडीतळ येथून रोज चार तेजस्वीनी बस धावणार आहेत. या बसमधून २२ महिला प्रवाशी प्रवास करणार आहेत. 

महिला प्रवासी योगीता भापकर म्हणाल्या नोकरी व्यवसायासाठी जाणाऱ्या महिला प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. कित्येकदा रांगेत ताटकळत उभे रहावे लागते. तसेच बसमध्ये अनेकदा जागा मिळत नाही. त्यामुळे महिलांना या बससेवाचा चांगलाच फायदा होणार आहे. 

सुरक्षिततेच्या दृष्टीने या बसमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे, जीपीआरएस सिस्टीम, अल्हाददायक सिटची रचना या बसमध्ये उपल्बध आहेत. रोज चार बस गाडीतळ ते वारजे या दरम्यान धावणार आहेत. या बसेससाठी महिला कंडक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना या सेवेमुळे सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे.

या बसच्या उद्घाटनप्रसंगी डेप्युटी आरटीओ विनोद सगरे, वित्तविभाग प्रमुख विनोद होले, गाडीतळ डेपो व्यवस्थापक कैलास गावडे उपस्थित होते. 

गावडे म्हणाले, महिला प्रवाशांची सुविधा व्हावी यासाठी महिलांची स्वतंत्र बसची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती. त्यामुळे त्यांना रांगेत ताटकळत उभे राहू लागू नये, बसमध्ये उभे राहून प्रवास करावा लागू नये यासाठी तेजस्वीनी बसेसची भूमीका महत्वाची राहणार आहे. शहरातील प्रत्येक डेपोतून अशा बसेस महिला दिनी सुरू करण्यात आल्या असून सर्व डेपोत एकुण ३८ तेजस्वीनी बसेसे धावणार आहेत. 

Web Title: Marathi news pune news womens day tejaswini bus starts