पत्नीविषयी आक्षेपार्ह बोलल्याने मित्राचे कापले गुप्तांग

जनार्दन दांडगे
गुरुवार, 18 जानेवारी 2018

देवांग चंद्रकांत देसाई (वय ५१, सध्या  मार्गवस्ती, नायगाव, ता. हवेली मुळ रा. नवसरी, ता. जमापूर, गुजरात) त्या जखमीचे नाव असून त्यास मारहाण केल्याप्रकरणी सुनील रघुनाथ कटके (रा. मार्गवस्ती, नायगाव, ता. हवेली) यास लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुणे : उरुळी कांचन येथे दारू पीत असताना पत्नीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने चिडलेल्या एकाने तीक्ष्ण हत्याराने मित्राचे गुप्तांग कापून बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी (ता. १७) नायगाव (ता. हवेली) येथे घडली.

देवांग चंद्रकांत देसाई (वय ५१, सध्या  मार्गवस्ती, नायगाव, ता. हवेली मुळ रा. नवसरी, ता. जमापूर, गुजरात) त्या जखमीचे नाव असून त्यास मारहाण केल्याप्रकरणी सुनील रघुनाथ कटके (रा. मार्गवस्ती, नायगाव, ता. हवेली) यास लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी देवांग देसाई व सुनील कटके हे मित्र असून देवांग देसाई हा नायगाव हद्दीतील मार्गवस्ती परिसरातील फ्रेश पोल्ट्रीवर व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोघेही पोल्ट्री फर्मावरील एका खोलीत दारू पीत बसले होते. दोघांमध्ये चेष्टा मस्करी चालू असताना सुनील कटके याने देसाईला एकटपणावरून चिडवले, त्यास प्रत्युत्तर म्हणून देसाई याने सुनील कटकेच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे चिडलेल्या सुनीलने जवळच पडलेल्या तीक्ष्ण हत्याराने देसाईवर वार करण्यास सुरुवात केली. यात त्याने देसाई याच्या गुप्तांगावर वार केले. मारहाणीनंतर सुनीलने देसाई याला खोलीत बंद करून तेथून निघून गेला. जखमी अवस्थेतील देसाई याने आपल्या जवळील फोनवरून मित्राला बोलावून स्वतः लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल झाला. 

दरम्यान लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोंडूभैरी यांनी जखमीची विचारपूस करून घडलेल्या घटनेची माहिती घेतली असता सुनील कटके याने मारहाण केल्याची माहिती दिली. यावर पोलिसांनी तातडीने हालचाल करून सुनील कटके यास ताब्यात घेतले असता वरील घटनेचा उलगडा झाला. वरील घटनेचा तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोंडूभैरी यांच्या मार्खादर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Marathi news pune news youth beaten friend

टॅग्स