कर्वेनगर येथे खांबाला धडकून दुचाकीचालकाचा मृत्यू

राजेंद्रकृष्ण कापसे 
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

दिनेश राजेंद्र इंगळे (वय ३० सद्या रा. वारजे माळवाडी, पुणे)  असे त्या मुलाचे नाव आहे. वडील राजेंद्र नारायण इंगळे (वय ५० सद्या रा.वारजे माळवाडी) हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. असे वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी सांगितले. 

वारजे माळवाडी : कर्वेनगर उड्डाणपुलाचे काम सुरू असून तेथील एका खांबास दुचाकी चालक धडकल्याने झालेल्या अपघातात मुलगा व वडील गंभीर जखमी झाले होते. परंतु उपचारा दरम्यान मुलाचा मृत्यू झाला आहे. 

दिनेश राजेंद्र इंगळे (वय ३० सद्या रा. वारजे माळवाडी, पुणे)  असे त्या मुलाचे नाव आहे. वडील राजेंद्र नारायण इंगळे (वय ५० सद्या रा.वारजे माळवाडी) हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. असे वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी सांगितले. ते दोघेजण रविवारी रात्री उशिरा कोथरुडहुन घरी वारजे माळवाडी येथे परत येत होते. ते दोघे ही मूळचे अकोला येथील आहेत. त्याबाजूने येताना एका खांबाला त्यांची दुचाकी जाऊन धडकली. अपघाताच्या ठिकानाजवळ वारजे माळवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत कर्वेनगर पोलीस चौकी आहे. येथील कर्मचारी बालारफी शेख, संतोष गवारी, ज्ञानेश्वर कुंभार यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. यावेळी दोघांच्या डोक्याला जखम होऊन रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. उपचार सुरू असताना दिनेशचा मृत्यू झाला. तर वडील गंभीर जखमी असून ससूनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

इंगळे हे मूळचे अकोला येथील आहेत. सध्या ते वारजे माळवाडी येथील गोकुळनगर भागात राहत होते. अपघातात मृत झालेल्या दिनेशची आईचे निधन झाले आहे. दिनेशचे लग्न झालेले नव्हते. तो व वडील वारजे येथे राहत होता. दिनेश एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करीत होता. अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: Marathi news Pune news youth dead in accident