जिल्हा परिषद सभापती व सदस्यांनी घेतली द्राक्ष व डाळींब शेतीची माहिती

राजकुमार थोरात
गुरुवार, 1 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : आेसाड माळरानावर बहरलेले द्राक्षांचे मळे....दगडधोंड्यामध्ये फुललेली डाळिंबाच्या बागा... माळरानावरती पाण्याने गच्च भरलेली शेततळी पाहुन पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके यांच्यासह चार महिला जिल्हा परिषद सदस्य भारावून गेल्या. शेतकऱ्यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. 

इंदापूर तालुक्यातील शेळगावमधील जिल्हा परिषद सदस्य भारती मोहन दुधाळ यांच्या शेतामध्ये  झेडपीच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, जिल्हा परिषद सदस्य  वैशाली प्रतापराव पाटील, रोहिणी रविराज तावरे, तुलशी सचिन भोर व  मीनाक्षी किरण तावरे यांच्या गाड्यांचा ताफा आला होता.

रस्त्याने दिसणारे  द्राक्षांच्या हिरव्यागार बागा, दगडधाेंड्यामधील डाळिंबाचा बागा, शेततळी, शेतकऱ्यांनी बांधले अलिशान एकापेक्षा एक मोठे बंगले पाहुन महिला झेडपी सदस्या भारावून गेल्या. शेळगाव मधील जिल्हा परिषद सदस्य भारती दुधाळ यांच्या कुंटूबातील सदस्यांनी ४ एकर क्षेत्राचे ८० एकर क्षेत्र केले असून यामध्ये ४० एकर क्षेत्रामध्ये द्राक्षाची बाग, २० एकर क्षेत्रामध्ये डाळिंबाची बाग माळरानावर फुलवली आहे. दुधाळ यांच्या द्राक्ष व डाळिंबाच्या शेतीची पाहणी केल्यानंतर जिल्हातील शेतकऱ्यांनी दुधाळ कुंटूबाचा शेतीचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या शेतीची कास धरावी.

दुधाळांनी कष्ट केल्यामुळे आज माळरानावरती द्राक्ष व डाळिंब पिकांचे मळे फुलविले असल्याचे सांगून दुधाळ कुंटूबाचे कौतुक केले. झेडपी सदस्यांनी बांधावर बसण्याची, द्राक्ष चाखण्याची, द्राक्षाच्या बागेमध्ये फिरण्याचा आनंद घेतला. यावेळी गुलाब दुधाळ, पारुबाई  दुधाळ, मोहन दुधाळ, सुभाष दुधाळ जिल्हा परिषद सदस्य भारती  दुधाळ व किर्ती दुधाळ यांनी जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार केला. 

यावेळी इंदापूर पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ.सोनाली  ननवरे, माजी सरपंच अलका  ननवरे, सायली बनसोडे, रंजना शिंदे, आरती दुधाळ, शहाजी ननवरे, रामभाऊ बनसोडे, डॉ.सचिन ननवरे, नामदेव घुटे, पप्पू खोमणे, हेमंत दुधाळ उपस्थित होते. 

Web Title: Marathi news pune news zp sabhapati information pomegranate grapes