जिल्हा परिषदेच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा..

राजकुमार थोरात
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

वालचंदनगर (पुणे) : युवकांनी जिल्हा परिषदेच्या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवून त्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी केले.

अकोले (ता.इंदापूर) येथे आठवडे बाजारतळाच्या विकासकामांच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होेते. येथे पणनच्या माध्यमातून 25 लाख रुपये खर्चुन बाजारतळावर विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. यावेळी सरपंच गिता दराडे, उपसरपंच जयश्री दराडे, पांडुरंग दराडे, दादासो वनवे, निलेश अष्टेकर, शामराव दराडे, कमलाकांत वनवे उपस्थित होते.

यावेळी माने यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ समाजातील सर्व नागरिकांना मिळणे गरजेचे आहे. झेडपीच्या अनेक योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती नसल्यामुळे आजही अनेक नागरिक योजनांपासुन वंचित राहत असल्याचे चित्र ग्रामीण भागामध्ये पहावयास मिळत असल्यामुळे प्रत्येक गावातील युवकांनी झेडपीच्या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवून नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न करावा.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुलांची गुणवत्ता इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील मुलांपेक्षा चांगली अाहे. दिवसेंदिवस जिल्हा परिषदेच्या शाळांचा पटदेखील वाढत असल्याबद्दल शाळेतील शिक्षकांचे माने यांनी कौतुक केले. आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातुन तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्याचे काम सुरु आहेत. यावेळी माने यांनी येथील नियोजित भगवानबाबा मंदिराच्या ठिकाणाची पाहणी करुन मंदिरासाठी 15 लाख रुपये निधी देण्याचे आश्‍वासन दिले. 
 
Web Title: Marathi news pune news zp schemes common man