गोपीनाथ मुंडे हे नेतृत्व घडवणारी फॅक्‍टरी - पंकजा मुंडे 

marathi news pune pankaja munde gopinath munde
marathi news pune pankaja munde gopinath munde

पिंपरी - उत्कृष्ट लोकनेता होणे हे गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी मी भविष्यात काम करील. ते नेतृत्व घडवणारे फॅक्‍टरी होते, असे प्रतिपादन ग्रामविकास व महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी रहाटणी येथे केले. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 68 व्या जयंती निमित्त रहाटणी येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती समितीच्या वतीने 'आठवणीतले मुंडे साहेब' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, त्यांची आठवण त्यांच्या मित्रांना नेहमी येतेच. परंतु त्यांच्या शत्रूंना देखील त्यांची आठवण येते. सकारात्मक स्वभावामुळेच ते यशस्वी झाले. माझ्या मुलीने मला निवडून आणले हे ते अभिमानाने राज्यभर सांगायचे. मुले-मुली असा भेदभाव त्यांनी केला नाही. बारामतीत मी जेव्हा युवा मोर्चाची एल्गार सभा घेतली, तेव्हा ती पाहण्यासाठी ते टीव्ही पुढे बसले आणि सभेला झालेली गर्दी पाहून माझे भाषण संपताच त्यांनी मला फोन करुन अभिनंदन केले. तरुणांना संधी देण्याचे त्यांचे धोरण होते. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, पायलट रमीला लटपटे, विजय वडमारे, अंजिक्‍य गायकवाड यांचा पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गिते, उपमहापौर शैलजा मोरे, आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, सुनील कर्जतकर, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, भाजप प्रदेश सचिव उमा खापरे, अमित पालवे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे आदींसह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे संयोजन सदाशिव खाडे, आबा नागरगोजे, रघुनंदन घुले, अरुण पवार, सुभाष गराडे, केशव घोळवे, बाबू नायर, गणेश ढाकणे, सुभाष पालवे, माऊली थोरात, चंद्रकांत नखाते, बाबा त्रिभूवन, दिपक जाधव, श्रीनिवास नढे, अशोक सोनवणे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन भगवान सेना पिंपरी चिंचवड, बीड जिल्हा मित्र मंडळ, राष्ट्र संत भगवान बाबा प्रतिष्ठान पुणे, जय भगवान युवा फाऊंडेशन, ब्रम्हचैतन्य फाऊंडेशन, मराठवाडा जनविकास संघ, मराठवाडा मित्र मंडळ, भगवान बाबा मित्रमंडळ, जय भगवान महासंघ, लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान व लोकनेते गोपीनाथ मुंडे विचारमंच पिंपरी चिंचवड आदी संस्थांनी केले. प्रास्ताविक सदाशिव खाडे यांनी केले आभार मोरेश्वर शेडगे यांनी मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com