मोटारीत आढळला कुजलेला मृतदेह 

संदीप घिसे
सोमवार, 5 मार्च 2018

भक्ती शक्ती चौक निगडी येथे एका मोटारीमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला.

पिंपरी - भक्ती शक्ती चौक निगडी येथील एका मोटारीमध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवारी (ता. ५) दुपारी घडली. राहुल खुळे (रा. प्राधिकरण पेठ क्रमांक २७, निगडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भक्ती शक्ती चौक निगडी येथे एका मोटारीमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला.

सदर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच  मृत्यूचे कारण समोर येईल. राहुल खुळे हे टाटा कंपनीमध्ये कामाला होते. मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून ते घरी आले नव्हते. याबाबत त्यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची फिर्याद पोलिसांत दिलेली नव्हती. मोटारीच्या क्रमांकावरून पोलिसांनी मयत राहुल खुळे यांची ओळख पटवली. सध्या पोलिसांनी आकस्मात मृत म्हणून नोंद केली आहे. याबाबत अधिक तपास निगडी पोलिस करत आहेत.

Web Title: marathi news pune pimpri car dead body found