'सकाळ'चे क्षीरसागर पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी 

संतोष शेंडकर
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

सोमेश्वरनगर - बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक 'सकाळ'चे वडगाव निंबाळकर बातमीदार चिंतामणी क्षीरसागर यांची तर 'सकाळ'चेच डोर्लेवाडीचे बातमीदार सोमनाथ भिले व सोमेश्वरनगरचे लोकमतचे बातमीदार महेश जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे बारामती तालुका पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष अॅड. गणेश आळंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी बैठक संपन्न झाली. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे, अशोक वेदपाठक, शहाजी शिंदे, राजेश वाघ, राजेंद्र गलांडे, हेमंत गडकरी, संतोष भोसले, युवराज खोमणे, सचिन वाघ आदी उपस्थित होते. याप्रसंगी क्षीरसागर यांची अध्यक्षपदी, तालुक्याच्या पश्चिम भागातून महेश जगताप तर पूर्व भागातून सोमनाथ भिले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी काशिनाथ पिंगळे (दै. पुढारी, लोणी भापकर) यांची तर खजिनदारपदी विनोद पवार (दै. लोकमत/प्रभात, मोरगाव) यांची बिनविरोध निवड पार पडली. 

Web Title: marathi news pune sakal media journalist chintamani kshirsagar