जुनी सांगवीत शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी

रमेश मोरे
रविवार, 4 मार्च 2018

मधुबन मित्रमंडळाच्या वतीने सकाळी शिवाजी महाराजांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी शिवस्वामी संघाच्या वतीने सामुहिक शिववंदना घेण्यात आली.

जुनी सांगवी - येथे विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संस्था, सामाजिक संघटना, मित्र मंडळांच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. येथील मधुबन मित्रमंडळाच्या वतीने सकाळी शिवाजी महाराजांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी शिवस्वामी संघाच्या वतीने सामुहिक शिववंदना घेण्यात आली. मधुबन मित्र मंडळ आयोजित शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने जेष्ठ सदस्य मा. रविन्द्रजी ओव्हाळ यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी शिवभक्त कौस्तुभ पाटील व अजय कसाब यांनी शिवचरीत्रावरील पोवाडे सादर केले. यावेळी मंडळाचे संस्थापक विजय बापू ढोरे, आर. डी. जावळे, रविन्द्र गायकवाड, पराग ढोरे, सुधाकर पवार, नरेंद्रभाऊ चौधरी, दिपक होणमाने, विनायक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मंडळाचे अध्यक्ष गणेश ढोरे यांनी केले.

अभिनव तरूण मंडळ संयुक्त जाणता राजा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त मोफत दुचाकी पि. यु. सी. करण्यात आली. सकाळी सांगवी पोलिस ठाण्याचे श्री बलभिम ननावरे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले. मंडळाचे चेतन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पाचशे दुचाकी वाहनांची मोफत पी. यु. सी. चाचणी करण्यात आली. सुहास कुंभार, अमित खरात, यांनी परिश्रम घेतले. येथील सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यात खेळपैठणीचा कार्यक्रमात महिलांसाठी पैठणी, सोन्याची नथ, पंखा अशा भेटवस्तु देण्यात येणार आहेत. याचबरोबर सांगवी प्रतिष्ठान, अखिल सांगवी गावठान इत्यादींच्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

Web Title: marathi news pune sangvi shivaji maharaj jayanti programs