शनिवारवाड्यावर कार्यक्रमाबाबत गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

पुणे - शनिवारवाड्यासमोरील मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याबाबत महापालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय होईल त्यानंतर सर्वसाधारण सभेत अंतिम निर्णय होईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी जाहीर केले. येथील कार्यक्रमांबाबत पुढील महिनाभरात निर्णय होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, शनिवारवाडा येथे कार्यक्रमांना परवानगी देण्याची मागणी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली. 

येथील जागेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. येथे कार्यक्रमांना परवानगी न देण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेला सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोध केला. प्रशासनाचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत धीरज घाटे यांनी शनिवारवाडा येथे सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याची मागणी केली. त्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही त्यांना पाठिंबा दिला. 

घाटे म्हणाले, ""शनिवारवाड्याच्या आवारात अनेक महत्त्वाचे कार्यक्रम झाले आहेत. त्यामुळे येथे सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदीचा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांसाठी संस्थांना परवानगी द्यावी.'' दरम्यान, अरविंद शिंदे, सुभाष जगताप यांनीही कार्यक्रमांना परवानगी देण्याची मागणी केली. त्यावरून सभागृहात काही वेळ गोंधळ उडाला. 

महापौर टिळक म्हणाल्या, ""प्रशासनाच्या निर्णयाबाबत यापूर्वी नाराजी व्यक्त केली आहे. कार्यक्रमांबाबतचा विषय गटनेत्यांच्या बैठकीत आहे. तीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.'' 

Web Title: marathi news pune shaiwarwada