पुणे सोलापूर महामार्गावर वाहनाच्या धडकेत दोघे ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

लोणी काळभोर - पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) गावच्या हद्दीमध्ये एमआयटी कॉर्नर येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील सुभकरा उर्फ सुभाष रामअण्णा शेट्टी (वय- 64 रा. माई हाईट, लोणी स्टेशन, ता. हवेली) व भोलासिंग जगदीश सिंग (वय - 30, रा. रामाकृषी रसायन कंपनी, थेऊर, ता. हवेली) हे दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना घडली. याबाबतची तक्रार भोलासिंग याचा चुलतभाऊ सुनीलकुमार विश्वेश्वर सिंग (वय - 28) याने लोणी काळभोर पोलिसांत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामा कृषी रायायन कंपनीचे कॅन्टीनचालक सुभकरा शेट्टी हे रविवारी (ता. 11) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे कॅन्टीन बंद करून भोलासिंग सोबत दुचाकीवरून घरी निघाले होते. रात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावरील एमआयटी कॉर्नर येथे दुचाकीवरून महामार्ग ओलांडत होते. याचवेळी सोलापूर बाजूने भरधाव वेगात आलेल्या वाहनाने त्यांच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. जोरदार धडक बसल्याने दोघेही दुचाकीवरून खाली पडले. पाठीमागून आलेल्या वाहनाखाली सापडून चिरडले गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. सुनीलकुमार सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोंडूभैरी करीत आहेत.

Web Title: marathi news pune solapur highway accident two wheeler