आयटी अभियंता तरुणीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

मुंढवा - येथील पिंगळे वस्तीतील पारपत्र कार्यालयाच्या सातव्या मजल्यावरून उडी टाकून 22वर्षीय संगणक अभियंता तरुणीने आत्महत्या केली. 

अश्‍विनी पांडुरंग गवारे (वय 22, सध्या रा. धर्मानगर, चंदननगर-खराडी, मूळ गाव विठ्ठलवाडी, शिरूर) असे या तरुणीचे नाव असून तिने आज सकाळी साडेअकराच्या सुमारास पासपोर्ट कार्यालयाच्या इमारतीतील सातव्या मजल्यावरील स्मोकिंग झोन येथून खाली उडी मारली. 

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. गवारे ही ग्लोबल टॅलेंट सर्च या खासगी कंपनीत चार महिन्यांपासून टेली काउन्सेलिंगचे प्रशिक्षण घेत होती. चार दिवसांपासून ती ट्रेनिंगला गैरहजर होती. आज सकाळी ट्रेनिंगसाठी आल्यानंतर काही वेळाने तिने सातव्या मजल्याच्या बाल्कनीतून उडी मारली. तिला एशिया कोलंबिया हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले; परंतु त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने घोषित केले.  पोलिस उपनिरीक्षक वाळके पुढील तपास करीत आहेत. 

Web Title: marathi news pune suicide