'तनिष्का'चे राजमाता जिजाऊंना वंदन

दत्ता म्हसकर
रविवार, 14 जानेवारी 2018

जुन्नर - जुन्नरच्या 'तनिष्का'ने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना साजेसा जयंती उत्सव साजरा केला. जिजाऊ व विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 'तनिष्का' गटाचे यांच्या वतीने आदर्श जयंती उत्सव साजरा करताना येथील पंचलिंग झोपडपट्टी वसाहतीमधील शंभर महिलांना थंडी पासून बचाव व्हावा यासाठी मायेची ऊब म्हणून शालींचे वाटप करण्यात आले. त्यांना यावेळी अल्पोपहार देण्यात आला. गटनेत्या उज्वला शेवाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.  

विवेकानंदाच्या जीवन कार्याविषयी शीतल खरपुडे यांनी मार्गदर्शन व जिजाऊबद्दल सुवर्णा ढोबळे, नगरसेविका अंकीता गोसावी यांनी विचार मांडले. याप्रसंगी नगरसेविका अंकिता गोसावी, मोनाली म्हस्के, हाजरा इनामदार, सुवर्णा बनकर, सना मन्सूरी यांच्या हस्ते जिजाऊ, शिवबा व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन वंदन केले. तनिष्का माधुरी म्हसकर, संगीता गोसावी, छाया शेवाळे, राधिका कोल्हे, प्रतिभा मेहेर, शोभा गायकवाड, मनीषा खेडकर, सुनीता वामन, छाया शेळके, सुवर्णा वाव्हळ, शोभा शिंदे, पूनम तांबे, महानंदा गोसावी, अनिता म्हस्के, वृषाली मंचरकर व अनेक महिला उपस्थित होत्या. उर्मिला थोरवे यांनी सूत्रसंचालन केले व आभार ज्योती मेहेर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुळजा भवानी महिला गट, विनायक गोसावी, गणेश कर्मे, सिद्धांत भागवत, स्वप्नील दप्तरे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: marathi news pune tanishka program rajmata jijau and swami vivekanand