"आरटीई' प्रवेशाला 7 मार्चपर्यंत मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

पिंपरी - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील व्यक्तींना "आरटीई'अंतर्गत मुलांच्या शाळा प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी सात मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. 

पिंपरी - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील व्यक्तींना "आरटीई'अंतर्गत मुलांच्या शाळा प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी सात मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. 

आरटीईअंतर्गत विविध शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिले जातात. त्यासाठी 25 टक्के जागा राखीव असतात. त्यातून प्रवेश मिळवण्यासाठी पालकांना ऑनलाइन अर्ज सादर करावयाचे आहेत. त्यासाठी पुणे विभागात 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. सुमारे हजार पालकांनी या कालावधीत अर्ज सादर केले. त्यातील निम्म्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. अनेक पालकांना अजूनही उत्पन्नाचा दाखला मिळालेला नाही. त्यामुळे आरटीई पालक संघाचे अध्यक्ष हेमंत मोरे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी शरद गोसावी यांच्याकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. 

"कोट्या'तील विद्यार्थ्यांना आरटीईची संधी योग्य प्रकारे उपलब्ध व्हावी, म्हणून 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार होते. अद्यापही अनेक पालक योग्य प्रकारे ऑनलाइन अर्ज सादर करू न शकल्याची शक्‍यता शिक्षण विभागाने वर्तवली आहे. अशा पालकांना पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरटीईअंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आता सात मार्चपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. www.rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हे अर्ज सादर करता येतील. 

Web Title: marathi news RTE education