सुटीनिमित्त लेण्याद्रीत भाविकांची गर्दी

दत्ता म्हसकर
सोमवार, 25 डिसेंबर 2017

जुन्नर : सलग तीन दिवस सुट्टयांमुळे श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भाविकांची गर्दी

जुन्नर : सलग तीन दिवस सुट्टयांमुळे श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भाविकांची गर्दी
 दि. २३, २४, २५ या तीन दिवसांच्या सलग सुट्टयांमुळे तसेच नाताळच्या सुटीमुळे अष्टविनायक गणपती देवस्थानापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री ता. जुन्नर येथे भाविकांची व पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष शगोविंद मेहेर यांनी दिली. सलग सुट्टयामुळे महाराष्ट्रातील तसेच गुजरात कर्नाटक मध्यप्रदेश व इतर राज्यातील भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणात होते. शैक्षणिक सहली देखील मोठया प्रमाणात येत आहेत, देवस्थानचे वतीने आलेल्या भाविक व पर्यटकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था, महाप्रसाद व्यवस्था, दर्शन मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दर्शन मार्गावर सुरक्षा रक्षकाची व्यवस्था करण्यात आली होती. 
देवस्थानचे वतीने दिलेल्या सुविधांबाबत तसेच व्यवस्थेबाबत भाविकांनी समाधान व्यक्त केले. 

 

Web Title: Marathi news rush in lenyadri due to holidays