कारखरेदीचा मुहूर्त साधा पाडव्याला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

पुणे - स्वतःच्या मालकीची कार असावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. येणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवारी (ता. १०) आणि रविवारी (ता. ११) ‘ऑटो एक्‍स्पो’चे आयोजन केले आहे. कार घेणे ही खूप अवघड गोष्ट आहे, असा अनेकांचा गैरसमज असतो. कारण कार घेताना ठिकठिकाणच्या शोरूमला भेटी द्यायच्या, विविध कंपन्यांच्या गाड्यांच्या फिचर्सची माहिती घ्यायची, त्यांची तुलना करायची, बजेट लक्षात घ्यायचे, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. याच साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे जेव्हा एकाच छताखाली मिळतात; तेव्हा कार घेण्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने विनासायास वास्तवात उतरते.

कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांच्या मनातील या सर्व प्रश्‍नांना दोन दिवसांच्या ‘ऑटो एक्‍स्पो’मध्ये उत्तरे मिळणार आहेत. बजेट कारपासून सेदान, एसयूव्ही असे असंख्य प्रकार नवीन व प्रीओन्ड कारमध्ये ग्राहकांना बघावयास मिळणार आहेत.

नवी कार असो वा प्री ओन्ड कार, सगळ्याच कार आता एका छताखाली पुणेकरांना पाहायला मिळणार आहे, त्यामुळे या गुढीपाडव्याला कार खरेदी निश्‍चितच होईल. 

 ‘सकाळ’ ऑटो एक्‍स्पो २०१८
 महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पूल परिसर, कर्वेनगर
 शनिवार (ता. १०) आणि रविवार (ता. ११) मार्च
 सकाळी ११ ते संध्याकाळी ७
 प्रवेश व पार्किंग मोफत 

Web Title: marathi news sakal auto expo 2018 pune car