महिलांनी स्वकर्तृत्वाने समाजात अस्तित्व निर्माण करावे-शैलजा मोरे

रमेश मोरे
गुरुवार, 25 जानेवारी 2018

जुनी सांगवी : महिलांनी स्वकर्तृत्त्वाने समाजात अस्तित्व निर्माण करावे. महिला सर्व क्षेत्रात कामाच्या माध्यमातुन पुढे येत आहेत. महिला बचतगटाच्या माध्यमातून सामुहिक उपक्रमाद्वारे स्वकर्तृत्वाने समाजात अस्तित्व निर्माण करावे. तसेच शासनाच्या विविध योजना पोचण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करावे. याचबरोबर महिलांना सामाजिक पाठिंबा मिळाला तप प्रत्येक क्षेत्रात महिला स्वताच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवु शकतात असे जुनी सांगवी येथे राहीमाई महिला प्रतिष्ठान आणि जे.डी.

जुनी सांगवी : महिलांनी स्वकर्तृत्त्वाने समाजात अस्तित्व निर्माण करावे. महिला सर्व क्षेत्रात कामाच्या माध्यमातुन पुढे येत आहेत. महिला बचतगटाच्या माध्यमातून सामुहिक उपक्रमाद्वारे स्वकर्तृत्वाने समाजात अस्तित्व निर्माण करावे. तसेच शासनाच्या विविध योजना पोचण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करावे. याचबरोबर महिलांना सामाजिक पाठिंबा मिळाला तप प्रत्येक क्षेत्रात महिला स्वताच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवु शकतात असे जुनी सांगवी येथे राहीमाई महिला प्रतिष्ठान आणि जे.डी. ग्रुप यांच्या संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या हळदी-कुंकू आणि तिळगूळ वाटप कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शैलजा मोरे यांनी बोलताना व्यक्त केले. 

कार्यक्रमादरम्यान, सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सांगवी व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनवणे, उषा मुंडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य संतोष ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, हर्षल ढोरे, युवा नेते जवाहर ढोरे आदी उपस्थित होते.  यावेळी शिवलिंग किणगे, संतोष ढोरे, रामकृष्ण राणे, सत्यम ढोरे, प्रथमेश उथळे, नारायण हिरवे, आदिती निकम यांना विविध क्षेत्रात नैपुण्य व निवड झाल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नामदेव तळपे यांनी, तर जवाहर ढोरे यांनी आभार मानले. 

 

Web Title: Marathi news sangavi news