संगीत नाट्यमहोत्सवाची मेजवानी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुणेकरांचा गुढीपाडव्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विशेष संगीतनाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. ‘संगीत मानापमान’, ‘संगीत संशय कल्लोळ’ या नाट्य रसिक आणि समीक्षकांनी पसंतीची मोहोर उठविलेल्या संगीत नाटकांचे प्रयोग होणार आहेत. त्याचसोबत संगीताची मेजवानी देणारा ‘चैत्र पाडवा पहाट’ हा कार्यक्रमही १८ मार्चला सकाळी सहा वाजता होणार आहे.

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुणेकरांचा गुढीपाडव्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विशेष संगीतनाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. ‘संगीत मानापमान’, ‘संगीत संशय कल्लोळ’ या नाट्य रसिक आणि समीक्षकांनी पसंतीची मोहोर उठविलेल्या संगीत नाटकांचे प्रयोग होणार आहेत. त्याचसोबत संगीताची मेजवानी देणारा ‘चैत्र पाडवा पहाट’ हा कार्यक्रमही १८ मार्चला सकाळी सहा वाजता होणार आहे.

याबाबत राहुल देशपांडे म्हणाले, ‘‘संगीत नाटके आणि नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम करताना मला विशेष आनंद होत आहे. ‘संगीत मानापमान’ विशेष सादर करत नाहीत. संगीताच्या दृष्टीने ते नाटक अतिशय महत्त्वाचे आहे. इतकी गाजलेली पदे असलेले असे ते संगीत नाटक आहे. १९०६ मध्ये प्रथम त्या नाटकापासून संगीत दिग्दर्शक ही उपाधी दिली गेली. गोविंदराव टेंबे या नाटकाचे संगीत दिग्दर्शक होते. खरंतर त्यातील नाट्यगीते त्या काळात अतिशय गाजलेली आहेत. चंद्रिका ही जणू, मला मदन भासे, युवती मना, भाली चंद्र ही अशी अनेक नाट्यपदे अजूनही रसिकांच्या मनावर राज्य करतात आणि चैत्रपाडवा पहाट हा कार्यक्रम पूर्णत- नाट्यसंगीताचा असणार आहे. संगीतनाटके, नाट्यगीते असलेला नाट्यसंगीताचा प्रवास असेही चैत्र पाडवा पहाट या कार्यक्रमाला म्हणता येईल.’’

पु. ना. गाडगीळ (नळ स्टॉप) हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. हे सह प्रायोजक आहेत. नाट्य रसिकांना दर्जेदार अभिनयाची व नाट्यसंगीताची मेजवानी देणाऱ्या या महोत्सवाच्या तीनही दिवसांसाठीची; तसेच प्रत्येक प्रयोगासाठीची प्रवेशिका शनिवार (ता. १०) पासून पु. ना. गाडगीळ (नळस्टॉप), लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, नारायण पेठ येथे उपलब्ध होणार आहे. संपूर्ण महोत्सवासाठी ४०० रुपये, तर प्रत्येक दिवसासाठी २०० व १०० रुपये (बाल्कनी) असे प्रवेशमूल्य आहे. फोन व ऑनलाइन बुकिंगही आजपासून सुरू.

‘सकाळ’ संगीतनाट्य महोत्सव
गुरुवार (ता. १५ मार्च) - ‘संगीत मानापमान’ (राहुल देशपांडे व प्रियांका बर्वे) 
शुक्रवार (ता. १६ मार्च) - ‘संगीत संशयकल्लोळ’ (राहुल देशपांडे व प्रशांत दामले) 
रविवार (ता. १८ मार्च) - चैत्र पाडवा पहाट (राहुल देशपांडे) 
कुठे : टिळक स्मारक मंदिर, पुणे
केव्हा : रोज रात्री ९.३० वाजता (१५ व १६ मार्च) 
चैत्र पाडवा पहाट - सकाळी ६ वाजता (ता. १८ मार्च)
प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण व वेळ : शनिवार (ता. १०) पासून टिळक स्मारक मंदिर सकाळी (९ ते ११.३०) व संध्याकाळी (५ ते ८), पु. ना. गाडगीळ, निसर्ग हॉटेल लेन, नळस्टॉप, पुणे आणि लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, केसरीवाडा, नारायण पेठ, पुणे (स. ११ ते सायं. ५)

Web Title: marathi news sangeet natyamahostav sakal pune